गोवा विधानसभेत कोरोना चाचणीची लगबग; दिगंबर कामत कोरोना निगेटिव्ह

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना पणजीचे आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

पणजी: गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना पणजीचे आमदार आतानासिओ उर्फ बाबूश मोन्सेरात यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे विधिमंडळ सचिवांनी सर्व आमदार व कर्मचारी यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले होते.

पणजीच्या महापौरपदी रोहित मोन्सेरात तर उपमहापौरपदी वसंत आगशीकर 

त्यानुसार विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली असता त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यांनी ही माहिती आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली असून त्या ट्विटर अकाऊंटवर कोरोनाची लागण झाली नसल्याचा वैद्यकीय अहवालही सार्वजनिक केलेला आहे. कोरोनाची महामारी राज्यात पसरल्यानंतर विशिष्ट प्रकारचा मास्क कामत त्यांनी शिवून घेतला आहे.  वर्तमानपत्रांनीही त्या मास्क सहित आपले छायाचित्र प्रसिद्ध करावे यासाठी ते आग्रही असतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना जनतेने मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या