आघाडीपटू उत्तम राय पुन्हा धेंपो संघात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

भारताचा माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय आघाडीपटू उत्तम राय पुन्हा एकदा धेंपो स्पोर्टस क्लब संघात दाखल झाला आहे. 

पणजी: भारताचा माजी ज्युनियर आंतरराष्ट्रीय आघाडीपटू उत्तम राय पुन्हा एकदा धेंपो स्पोर्टस क्लब संघात दाखल झाला आहे. गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेसाठी माजी आय-लीग विजेत्या संघाने त्याला करारबद्ध केल्याचे जाहीर केले.

ISL : वर्चस्व राखूनही अपयश; नशिबवान जमशेदपूरला गोलशून्य बरोबरीमुळे गुण

सिक्कीममध्ये जन्मलेला उत्तम यापूर्वी 2014 मध्ये धेंपो क्लबकडून खेळला होता. कोलकात्यातील मोहन बागान, चेन्नईयीन एफसी, गोव्याचा चर्चिल ब्रदर्स या प्रमुख संघातर्फे खेळल्यानंतर तो पुन्हा `द ईगल्स` संघात रुजू झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्तमने भारताच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले असून इंडियन सुपर लीग (आयएसएल) व आय-लीग स्पर्धेत खेळण्याचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. मोसमात तो धेंपो क्लबच्या 24 क्रमांकाच्या जर्सीत खेळताना दिसेल.

``फार मोठा इतिहास असलेल्या धेंपो क्लबमध्ये रुजू होताना उत्साहित आहे. सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज असून क्लबला गोव्यात चँपियन बनविण्यासाठी वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न असतील,`` असे उत्तम याने नमूद केले.  
 

संबंधित बातम्या