सुभाष वेलिंगकरांच्या वक्तव्यावरुन वादंग, सर्वपक्षीय आक्रमक

माजी मंत्री मिकी पाशेको यांची वेलिंगकर यांच्याविरोधात कोलवा पोलिसात तक्रार दाखल
Subhash Velingkar
Subhash VelingkarDainik Gomantak

पणजी : सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्सबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटू लागले आहेत. सुरुवातीला केवळ ख्रिश्चन नेत्यांनीच वेलिंगकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला होता. आता गोवा फॉरवर्डच्या विजय सरदेसाईंनीही वेलिंगकरांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.

Subhash Velingkar
एनसीसी कॅडेट्ससाठी गोव्यात विशेष नौकानयन शिबिर

सुभाष वेलींगकर यांच्या सेंट झेव्हीयरच्या बाबतीत केलेल्या वक्त्याव्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलेले असताना गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनीही आमच्या शब्दातून वा कृतीतून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडून जाता कामा नये याचे तारतम्य बाळगले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गोव्यात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्यामुळे बाकीची काही राज्ये गोव्याकडे कौतुकाने तर काही राज्ये द्वेषाने पाहतात. आमची धार्मिक मते आम्ही दुसऱ्यावर लादून कुठलाही विद्वेष तयार होता कामा नये. आपण सर्वांनी एकत्र येऊन गोव्याचे भले कसे होणार याकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Subhash Velingkar
डिचोलीत बसस्थानकाजवळ मजुरांची पोलिसांकडून धरपकड

दरम्यान काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी आपल्या ट्विटमध्ये गोयचो सायब हे गोव्यातील सर्व धर्माच्या लोकांच्या भावार्थाचे प्रतीक असून तो एक भावनिक आधार आहे असे म्हणत. आम्हाला प्रत्येक धर्माचा आणि त्यांच्या चालीरीतींचा आदर करण्याची शिकवण दिली आहे. गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने योग्य ते उपाय घ्यावेत अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे.

Subhash Velingkar
गोव्याच्या काजू फेणीला अमेरीकन बाजारपेठ खुली

सेंट फ्रान्सिस झेव्हीयर यांच्या विरोधात अवमानकारकजनक व्यक्तव्य करून धार्मिक भावनेस ठेस पोहोचविल्याचा आरोपाखाली माजी मंत्री मिकी पाशेको यांनी हिंदू रक्षा महाआघाडीचे नेते सुभाष वेलींगकर यांच्या विरोधात कोलवा पोलीस स्थानकावर तक्रार दिली आहे.

वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेव्हीयर हा 'गोयचो सायब' नसून प्रभू परशुराम हे खऱ्या अर्थाने 'गोयचे सायब' आहेत असे वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य दोन धर्मात धार्मिक कलह माजविणारे असून त्यामुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते असे नमूद करून त्यांच्या विरोधात भादंसंच्या 153 अ, 153 ब, 295 व 505 कलमाखाली गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान बाणावलीचे माजी आमदार आणि माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी वेलिंगकर यांच्या वक्तव्याचा निषेध करताना सेंट झेव्हियर यांना गोव्यात सर्व धर्माचे लोक मानत असून वेलिंगकर यांच्या वक्त्यव्याने राज्यातील धार्मिक सलोखा धोक्यात येऊ शकतो असे म्हटले आहे. वेलिंगकर यांना जर सेंट झेव्हीयरच्या पायाखाली राहायचे नसेल तर त्यांनी गोवा सोडून जावे असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com