‘गोंयकार’ असल्याचा मला सार्थ अभिमान

मी फक्त भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले नाही. गोव्यासाठीही ते जिंकले आहे. अशा शब्दात टेनिस स्टार लिएंडर पेस यांनी गोव्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.
‘गोंयकार’ असल्याचा मला सार्थ अभिमान
Leander Paes said I am very proud to be GonyakarDainik Gomantak

मडगाव: मी मूळ ‘गोंयकार’ माझी सर्व पाळेमुळे याच भूमीत आहेत. मी फक्त भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकले नाही. गोव्यासाठीही ते जिंकले आहे. मी गोवेकर असल्याचा मला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Paes) यांनी गोव्याबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.

तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी सध्या लियांडर गोव्यात आहे. काल असोळणे आणि चिंचोणे येथे त्याने लोकांबरोबर संवाद साधला. लियांडरचे मूळ घर तलेकटो - वेळ्ळी येथील. त्यामुळे तो म्हणाला, कित्येक वर्षांनी मी माझ्या घरी आलो, असे मला वाटत आहे.

Leander Paes said I am very proud to be Gonyakar
कॉंग्रेस म्हणतंय कोण मायकल लोबो?

लिएंडरबद्दल गोव्यात एक प्रवाद आहे की तो आपल्याला गोमंतकीय मानत नाही, तर बंगाली मानतो. काही वर्षांपूर्वी वेळ्ळी येथे त्याचा सत्कार करण्याचे ठरविले होते, पण त्याने तो स्वीकारला नाही. याबद्दल पत्रकारांनी त्याला छेडले असता, यात काहीच तथ्य नाही. वेळ्ळीतील चर्चने माझा ज्यावेळी सत्कार केला त्यावेळी मी तो स्वीकारलाही. या वेळ्ळी गावाने कित्येक खेळाडू या देशाला दिले याबद्दल मला रास्त अभिमानही आहे. गोव्यातून माझ्यासारखे आणखी ऑलिम्पियन तयार व्हावेत हीच माझी इच्छा आहे.

आपण गोंयकार असल्याचा दावा लिएंडरने केला. तो 100 टक्के खरा असल्याचा प्रत्यय काल सकाळी जेव्हा तो असोळणा मासळी मार्केटात मासे विकणाऱ्या महिलांना भेटला त्यावेळी आला. यावेळी त्याने या विक्रेत्यांशी मनोसोक्त गप्पा मारल्या. टोपलीत असलेले मासे बघून तो हरखून गेल्या सारखा वाटत होता. त्याने 500 रुपयांचे ‘कोकर''’ या जातीचे मासे विकत घेतले. यावेळी तो म्हणाला, ‘बांगडा’ माझा सर्वात अधिक प्रिय मासा आहे. या महिला रस्त्यावर उन्हात बसून मासे विकतात हे बघून खरेच वाईट वाटले. गोवा मुक्त होऊन एव्हढी वर्षे उलटली या महिलांना मासे विकण्यासाठी मार्केटही नसावे याचेच दुःख अधिक वाटते असे तो म्हणाला.

Leander Paes said I am very proud to be Gonyakar
गोमेकॉत रक्त तपासणीसाठी रांगा : रुग्णांचा जीव कासावीस

काल प्रचार सुरू करण्यापूर्वी तो आणि त्याची मैत्रिण किम यांनी असोळणे येथे हनुमान मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. त्यांच्याबरोबर तृणमूलचे स्थानिक नेते आंतोनियो क्लोविस डिकॉस्ता, राजेंद्र काकोडकर व स्वाती केरकर उपस्थित होत्या. काल त्याने मच्छिमारांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यांत्रिक बोटींनी बेलगाम मासेमारी केल्यामुळे सागरातील मत्स्यधन कमी झाले असून त्याचा परिणाम पारंपरिक मच्छिमारावर झाला आहे. त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यांना काही प्रमाणात सवलती देण्याबरोबरच ज्यावेळी मासेमारी बंद असते त्यावेळी ठराविक मानधन मिळाले पाहिजे, असे त्यांने सांगितले.

‘सवलतीच्या दरात शिक्षणाची गरज’

गोव्यातील मुलांना सवलतीच्या दरात शिक्षण मिळण्याची गरज असून त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तृणमूलचे सरकार सत्तेवर आल्यास यासाठी आम्ही प्राधान्य देऊ, असे आश्वासन लिएंडर पेस याने दिले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com