गोव्याला फिरायला जाताय जाणून घ्या नवीन नियम

दैनिक गोमंतक
गुरुवार, 22 एप्रिल 2021

मंगळवारी गोव्यात 26 लोकांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला हे आतापर्यंतचे एका दिवसात झालेले सर्वाधिक मृत्यू आहेत.

मंगळवारी गोव्यात 26 लोकांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला हे आतापर्यंतचे एका दिवसात झालेले सर्वाधिक मृत्यू आहेत. त्याच अनुषंगाने गोवा सरकारने बुधवारी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू लागू केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अनेक निर्बंधांची घोषणा केली आहे. नवीन नियमांनुसार डेस्टीनेशन वेडिंगसाठी जाणाऱ्यांनी पुढील नियम लक्षात घ्यावे. विवाह सोहळ्यासाठी 50 लोक उपस्तिथ राहू शकतात. तसेच अंत्यविधी साठी 20 लोक उपस्तिथ राहू शकतात. गोव्यामध्ये सध्या 9300 सक्रिय रुग्ण असून 1502 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 17 मृत्यूची नोंद झाली असून त्यात एक 27 वर्षीय तरुण आहे. (Learn new rules for walking in Goa)

गोव्यात नाईट कर्फ्यू लागू. काय सुरु? काय बंद?

पर्यटकांसाठी महत्वाचे
कसिनो, पंचतारांकित हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या पर्यटकांच्या आवडीची ठिकाणे चालूच राहतील परंतु केवळ अर्ध्या क्षमतेवर. रात्री दहाच्या अगोदर, या आस्थापनांना त्यांच्या जागेवर सुरु ठेवण्याची परवानगी असेल. परंतू,सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर गर्दी करण्यास बंदी आहे. सीआरपीसीच्या कलम 144 ची किनारपट्टीसह इतर ठिकाणी काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याचा अर्थ असा आहे की समुद्रकिनार्‍यावर पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास मनाई आहे. 

गोवा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (जीएमसीएच) येथील राज्यातील महामारी शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सावंत म्हणाले की, किनारपट्टीवर काही प्रमाणात इमर्जिंग हॉटस्पॉट्स वर सरकारचे लक्ष होते. त्याच अनुषंगाने सरकारने शास्त्रज्ञांच्या सल्याने मायक्रो-कंटेनमेंट झोन आणि निर्बंध लावले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दिली.

गोव्याचे माजी मंत्री सोमनाथ जुवारकर यांचे कोरोनाने निधन  

यावर नसतील निर्बंध
मॅन्युफॅक्चरिंग आणि वैद्यकीय उद्योग, कारखाने यांच्या कारभारावर कोणतेही बंधन येणार नाही, असे सावंत म्हणाले. दुकाने, मॉल्स, केमिस्ट, ही आस्थापने दररोज खुल्या राहतील आणि किराणा सामान खरेदी किंवा घाऊक साठा करण्याची आवश्यकता नव्हती. 

संबंधित बातम्या