खाणपट्टा याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

प्रतिनिधी
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021

राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा तसेच ८८ खाणपट्टे रद्द करण्यासंदर्भात दिलेला निवाडा मागे घेण्यात यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांद्वारे केला आहे.

पणजी - राज्यातील खाणपट्ट्यांच्या याचिकेवरील महत्त्वाची सुनावणी ४ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालय न्यायमूर्ती एम. आर. शहा व न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पीठासमोर येणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात खाण व्यवसाय बंद असल्याने या सुनावणीकडे राज्यातील खाण अवलंबितांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Farmers Protest : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींच्या ट्विटवर केंद्र सरकारने दिली...

सेझा गोवा, गोवा सरकार, फोमेंतो व २६ पंचायतींनी राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा तसेच ८८ खाणपट्टे रद्द करण्यासंदर्भात दिलेला निवाडा मागे घेण्यात यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांद्वारे केला आहे. ही सुनावणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती इंद्र बॅनर्जी, न्यायमूर्ती चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा या पीठासमोर येत होती. मात्र, आता ती नव्या पीठासमोर येणार आहे. सरकारने या सुनावणीवेळी राज्यातील खाण व्यवसाय सुरू होण्यासाठी बाजू मांडण्याची तयारी केली आहे.

शेतकरी आंदोलनासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

संबंधित बातम्या