'गोमंतकीय स्मारके' या विषयावर तरुण विजय यांचे व्याख्यान

गोमंतकात (Gomantak) प्राचीन वारसा (Ancient Heritage) वास्तूंची प्रदीर्घ परंपरा आहे. गोव्यातील बऱ्याच तालुक्यांत स्मारके व वास्तू, काही भग्नावस्थेत तर काही अवशेषरुपात शिल्लक आहेत.
'गोमंतकीय स्मारके' या विषयावर तरुण विजय यांचे व्याख्यान
लेखक, वक्ते, माजी खासदार, नवी दिल्लीचे अध्यक्ष तरुण विजयDainik Gomantak

पणजी: नामवंत लेखक, वक्ते, माजी खासदार (Writer, speaker, ex-MP) व राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे नवी दिल्लीचे (Delhi) अध्यक्ष तरुण विजय यांचे ‘अजिंक्य गोवा वारसा वास्तू व स्मृतीभ्रंश’ या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

भारतीय शिक्षण मंडळ, गोवा (Goa) या संस्थेने आयोजित केलेला हा कार्यक्रम दि. 12 ऑक्टोबर, 2021 रोजी पणजी येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात (Institute Menezes Braganza) सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

गोमंतकात (Gomantak) प्राचीन वारसा वास्तूंची प्रदीर्घ परंपरा आहे. गोव्यातील बऱ्याच तालुक्यांत स्मारके व वास्तू, काही भग्नावस्थेत तर काही अवशेषरुपात शिल्लक आहेत. या सर्व वास्तूंचे जतन करून आपल्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

लेखक, वक्ते, माजी खासदार, नवी दिल्लीचे अध्यक्ष तरुण विजय
मुरगाव पालिकेने मासळी मार्केटमधील विक्रेत्यांचे सर्वेक्षण केलं सुरु

तरुण विजय हे नामवंत लेखक, सक्रीय सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार आहेत. पांचजन्य ह्या राष्ट्रवादी विचाराच्या साप्ताहिकाचे ते सुमारे 22 वर्षे संपादक होते. पायोनियर या इंग्रजी (Pioneer or English) दैनिकातही त्यांनी बराच काळ लेखन केले आहे.

सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय शिक्षण मंडळ (Indian Board of Education) संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. श्रीनिवास यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.