Goa मध्ये बिबट्यांची दहशत वाढली; टेम्बे गावात डुकराचा फडशा

Goa: कुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leopard
LeopardDainik Gomantak

Kulem: कुळेत गेल्या 15 दिवसांपासून धारबांदोडा, कामुर्ली आणि राय या भागात बिबट्याने दहशत वाढविली आहे. त्याने टेम्बे गावात एका डुकराचा फडशा पाडला. त्यानंतर धारबांदोडामध्ये एका म्हशीच्या रेडकावर हल्ला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे.

वनखात्याच्या अधिकाऱ्यानी (Forest Department Officers) बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. 14 सप्टेंबर रोजी रात्री बिबटा बाळकृष्ण मराठे यांच्या गोठ्यात आला आणि म्हशीच्या रेडक्याचे पोट फाडले. अन्य म्हशी जेव्हा ओरडायला लागल्या तेव्हा जवळच असलेल्या बाळकृष्ण मराठे याला जाग आली. त्यांनी गोठ्याकडे धाव घेतली तेव्हा बिबट्या जंगलात पळाला.

Leopard
Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणाचा तपास आता नव्याने होणार

मराठे यांनी या घटनेची माहिती धारबांदोडा वन खात्याचे अधिकारी जल्मी यांना दिली. सकाळी वनखात्याचे गोपाळ जल्मी कर्मचारीसमवेत मराठे यांच्या गोठ्याजवळ येऊन रितसर पंचनामा केला व दुपारी पशुवैद्यकीय डॉ. परब यांनी रेडक्याचे पोस्टमार्टम केले. दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बिबट्यामुळे गावातील लोक रात्रभर जागे राहत आहेत. बिबट्याचा या भागात नेहमीच वावर असतो. बऱ्याच वेळी तो दृष्टीस पडतो. त्यामुळे जनावरांच्या जीवाला तर धोका आहेच शिवाय आम्हाला धोका आहे. त्यामुळे वनखात्याने या परिसराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामुर्लीचे सरपंच बासिलीओ फर्नांडिस यांनी केली आहे.

Leopard
Madgaon Municipality : माफीनामा देत 15 नगरसेवकांकडून अविश्‍वास ठरावावर स्वाक्षऱ्या

आमचे घर लोकवस्तीपासून काही अंतरावरच आहे. येथे रानटी जनावरांचा जास्त वावर आहे. याच भागात मोठे कुळागर व गोठ्यात दुधाच्या जास्त म्हशी आहेत. अनेक वर्षापासून मी या व्यवसायात आहे, तेव्हा सुरक्षेसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करून दोन वर्षे झाली अजूनपर्यंत परवानाच मिळाला नाही, असे बाळकृष्ण मराठे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com