Goa: म्हार्दोळमध्ये बिबट्याचा संचार, वन खात्याने बंदोबस्त करण्याची मागणी

Goa: म्हार्दोळ, मंगेशी परिसरात बिबट्याने घातला धुमाकूळ
Leopard
Leopard Dainik Gomantak

Goa: म्हार्दोळ, मंगेशी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून काल रात्री तर चक्क सीमेपाईण-म्हार्दोळ भागातून मध्यरात्री या बिबट्याने संचार करीत चार कुत्र्यांचा फडशा पाडला. सकाळी चारही कुत्री अर्धवट खालेल्या स्थितीत सापडली. या प्रकारामुळे या परिसरात घबराट पसरली असून वन खात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी म्हार्दोळ, मंगेशीवासीयांनी केली आहे.

चार महिन्यांपूर्वी सीमेपाईण बागवाडा - म्हार्दोळ (Mardol) येथे एका घराच्या खोपटात मेलेला बिबट्या सापडला होता. हा बिबट्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला होता, मात्र स्वतःच जखमी असल्याने त्याने या घरालगत असलेल्या खोपटात आश्रय घेतला. मात्र सकाळी तो मृत झाला. त्यानंतर वन खात्याने व पोलिसांनी या मृत बिबट्याला तेथून हलवले होते.

Leopard
Maharashtra: 75 वर्षांवरील वृद्धांचा प्रवास सरकारी बसमधून होणार मोफत

म्हार्दोळ तसेच मडकईच्या रानवटी भागात रात्रीच्या वेळेला बिबट्यांच्या कायम डरकाळ्या ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे परिसरातील लोक कायम भीतीच्या छायेत आहेत. रात्रीच्यावेळी कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांनाही वाहनाच्या प्रकाशात बिबट्या (Leopard) रस्ता पार करताना आढळला होता. त्यामुळे भीतीत अधिकच वाढ झाली आहे. रात्री कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना धोका निर्माण झाला आहे. एकटेदुकटे घरी परतताना मनात भीती घेऊनच कामगारांना घर गाठावे लागते.

Leopard
Sonali Phogat Murder: संशयित एडवीन नुनीस याच्यासह साथीदारांना पाच दिवस पोलीस कोठडी

पहाटेच्या वेळेला ‘मॉर्निंग वॉक'ला जाणाऱ्या लोकांतही भीती पसरली असून बिबट्याचा हल्ला केव्हा, कसा होईल, गे सांगता येत नाही, असे येथील एक ग्रामस्थ राजेंद्र कोरगावकर यांनी सांगितले. बिबट्यांचा कायम या भागात संचार असल्याने लोक घाबरत असल्याने वन खात्याने याप्रकरणी त्वरित कारवाई करीत बिबट्यांचा पूर्ण बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com