Goa: बुडून मरणाऱ्यांना वाचविण्यासाठी कंबर कसूया

गोव्यात (Goa) दरवर्षी असे बुडून मृत्यू (People Drowning) पावणाऱ्यांचे प्रमाण सरासरी २००च्या आसपास आहे.
Goa: World Drowning Prevention Day
Goa: World Drowning Prevention DayDainik Gomantak

मडगाव : जुलै २०१९ची घटना. तुये-पेडणे (Pernem, Goa) येथील एका विद्यालयाच्या वसतिगृहात राहणारे चार अल्पवयीन विद्यार्थी आपली फुटबॉल मॅच संपवून परत हॉस्टेलवर येत असताना वाटेत पाय धुवायला जवळच असलेल्या पाण्याने भरलेल्या एका टाकाऊ चिरेखाणीकडे गेले. आणि त्यावेळी दुर्दैवाने त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आज तीन वर्षांनंतरही लोक ही घटना विसरलेले नाहीत. प्रत्येक वर्षी जून- जुलै महिन्यात पाऊस पडतो त्यावेळी अशा धोकादायक चिरेखाणींचा आणि अन्य धोकादायक जलाशयांचा आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत येतोच. आमच्या लहानशा गोव्यात दरवर्षी असे बुडून मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण सरासरी २००च्या आसपास आहे. रस्त्यावरील अपघातांत मृत्यू पावणाऱ्यांच्या प्रमाणाशी तुलना केल्यास ही संख्या त्या संख्येपेक्षा ७५ टक्के एवढी आहे. जगात अशा प्रकारे बुडून मरणाऱ्यांची संख्या दरवर्षी ३.७२ लाख एवढी प्रचंड आहे. हे प्रमाण एकूण अपघाती मृत्यूंच्या तुलनेत ९ टक्के आहे. अशा बुडून मरणाऱ्यांचे ९० टक्के प्रमाण गरीब किंवा मध्यम उत्पन्न गटातील देशातील असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) मत आहे.

Goa: World Drowning Prevention Day
Goa: सर्वण फ्रेंड्स सर्कल असोसिएशनला नेहरू युवा केंद्राचा 'राज्य पुरस्कार'

यासाठीच जागतिक आरोग्य संघटनेने यंदापासून २५ जुलै हा ‘जागतिक जलसमाधी नियंत्रण दिन’ म्हणून पाळण्याचे ठरविले असून, ‘एकटाही बुडून मरणार नाही यासाठी प्रयत्न’ हे यंदाचे ब्रीद आहे. अशा दुर्दैवी घटना टळाव्यात म्हणून या निमित्त जागृती करून कोणत्या उपाययोजना होती घेता येणे शक्य आहे हे या दिनानिमित्त प्रशासकीय यंत्रणांवर बिंबविण्याचा प्रयत्न अपेक्षित आहे. गोव्यात अशी जागृती ‘गोवा कॅन’ (Goa Can) या संघटनेने हाती घेतली आहे. हे संपूर्ण वर्ष ही संघटना गोव्यात ही जागृती मोहीम राबविणार आहे, अशी माहिती या संघटनेचे निमंत्रक रोलंड मार्टिन्स यांनी दिली.

Goa: World Drowning Prevention Day
Goa: कॉंग्रेस नेतृत्व बदलाच्या प्रतीक्षेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com