कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करू: डॉ. प्रमोद सावंत

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पुन्हा आवाहन

साखळी: ‘घारून जाण्याचे कारण नाही, कोरोनाचा मुकाबला आपण सहजपणे करू शकतो. कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करूया, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा केले आहे.

कोरोना विषाणूने सगळीकडे थैमान घातल्याने साखळी मतदारसंघातील विशेष मुलांमधील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सांडू कंपनीची ‘सांडू शक्तीवर्धाक कीट’चे वितरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

कोरोना विषाणूचा सामना करून यामधून मुक्त झाल्यानंतर पहिल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. कोरोना विषाणूचा मुकाबला सर्वांनी एकजुटीने करावा. सरकार सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

सांडू कंपनीच्या सांडू फर्मास्युटीकल्स आयुर्वेदीक विभागाने खास पुरस्कृत करून हे औषध उपलब्ध करून दिले होते. यावेळी कंपनीचे प्रातिनिधी डॉ. संदीप सावंत व संजय सामंत यांचीही उपस्थिती होती.

 

संबंधित बातम्या