शिक्षणात मोबाईलचा योग्य वापर करू

dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

स्मार्टफोन देणाऱ्या दात्याला धन्यवाद देतानाच शिक्षणात या मोबाईलचा चांगला वापर करण्याची ग्वाही शुभम गुरू देविदास याने दिली. आगोंद येथील शुभम केशव सेवा साधना संचलित पैंगीण येथील श्री परशुराम वसतिगृहात राहून तो पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात शिकत आहे. यंदा तो इयत्ता सातवीत शिकत आहे. त्याचा मोठा भाऊ पंकज याच वसतिगृहात राहून श्रद्धानंद विद्यालयातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन दहावीनंतर पुढील शिक्षण घेत आहे.

काणकोण
दै. ‘गोमन्तक’चे वरिष्ठ छायापत्रकार सोयरू कोमरपंत यांच्या हस्ते त्याला स्मार्टफोन भेट देण्यात आला. यावेळी त्याचे वडील गुरू देविदास, भाऊ पंकज, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर, वर्ग शिक्षिका तन्वी नाईक, साईली बांदेकर, शिक्षक संकेत वारीक व सुभाष महाले उपस्थित होते. यावेळी कोमरपंत यांनी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात दै. ‘गोमन्तक’चे भरीव योगदान असल्याचे सांगितले.
दै. ‘गोमन्तक’ने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेण्यास एका मुलीच्या आईला दागिने विकण्याची वेळ आल्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शिक्षिका स्नेहल वेरेकर यांच्या फेसबुक पोस्टवर म्हापशाच्या दीपक मणेरीकर यांनी केलेल्या आवाहनानुसार केपे महाविद्यालयाचे प्राचार्य जॉयदीप भट्टाचार्य यांनी मोबाईल पुरस्कृत केले. त्यापैकी दोन मोबाईल काणकोणमधील विद्यार्थ्यांना देण्यात आले. कदंब वाहतूक महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी पुरस्कृत केलेला मोबाईलही काणकोणमध्येच देण्यात आला आहे. मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर यांनी दै. ‘गोमन्तक’च्या या सामाजिक कार्याबद्दल ‘गोमन्तक’ला धन्यवाद दिले.

संबंधित बातम्या