दिगंबर कामत यांनी जीवरक्षकांना दिले आश्वासन

Lifeguards have started holding an indefinite strike at Azad Maidan in Panaji
Lifeguards have started holding an indefinite strike at Azad Maidan in Panaji

पणजी: राज्यातील जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात समावेश करून घेण्याचे आश्‍वासन दिले होते ते सरकारने वर्ष उलटून गेले तरी न पाळल्याने त्यांना पुन्हा एकदा धरणे धरण्याची पाळी आणली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून प्रलंबित असलेल्या जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज केली आहे.

गेल्या शुक्रवारपासून राज्यातील सुमारे २५० जीवरक्षकांनी पणजीतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे सुरू केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या जीवरक्षकांना सामावून घेण्यात येईल असे सांगितले होते मात्र पर्यटन खात्याकडून कोणत्याच हाचलाचाली केल्या जात नसल्याने या जीवरक्षकांनी ही धरणे सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आज संध्याकाळी जीवरक्षकांनी सुरू केलेल्या धरणे ठिकाणी भेट घेतली. त्यांच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करून जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण त्यांच्याबरोबर राहू असे आश्‍वासन त्यांनी दिले. 


यावेळी या जीवरक्षक संघटनेचे नेतृत्व करत असलेल्या स्वाती केरकर म्हणाल्या की, जीवरक्षकांनी विशेष प्रशिक्षण घेतले असल्याने ते कुशल कामगार आहेत. गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत विविध कामासाठी कर्मचारी पुरविले जातात. त्यामुळे जीवरक्षक व महामंडळाच्या कामात फरक आहे. त्यामुळे सरकारने जीवरक्षकांसाठी वेगळे महामंडळ स्थापन करून त्याना सेवेत सामावून घेणे आवश्‍यक आहे. काही जीवरक्षकांचे वय अधिक आहे त्यामुळे ते मनुष्यबळ विकास महामंडळाच्या चौकटीत बसणार नाहीत, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना दिली. 


यावेळी कामत यांनी केरकर यांना जीवरक्षकांच्या मागण्यांबाबतची निवेदन तयार करून द्यावे व त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढण्याची विनंती करतो असे आश्‍वासन दिले. जीवरक्षकांनी गेल्या एक वर्षापूर्वी संप सुरू केल्यानंतर समुद्रात बुडून अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जीवरक्षक हे स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्यांना वाचवत आहे व गोवा हे सुरक्षित पर्यटन स्थळ असल्याची प्रतिमा उंचावत आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जीवरक्षकांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे मुष्किलीचे बनले आहे. सरकारने या प्रश्‍नावर तोडगा न काढल्यास हे हे ‘जलमसाधी’ स्थळ होण्यास वेळ वेळ लागणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com