"जीवरक्षकांना कंपनीऐवजी थेट नोकरीत घ्यावे": अजितसिंह राणे

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

दृष्टी कंपनीकडील जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात सामावून घ्यावे हे आश्वासन सरकारने पाळावे अशी मागणी कामगार नेते अॅड. अजितसिंह राणे यांनी केली.

पणजी: दृष्टी कंपनीकडील जीवरक्षकांना गोवा मनुष्यबळ विकास महामंडळात सामावून घ्यावे हे आश्वासन सरकारने पाळावे अशी मागणी कामगार नेते अॅड. अजितसिंह राणे यांनी केली. या मागणीसाठी संपकरी जीव रक्षकांनी पणजीच्या आझाद मैदानावर साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांना भेट देऊन राणे यांनी मार्गदर्शन केले.

यानंतर राणे यांनी सांगितले, समुद्रात बुडणाऱ्यांचा जीव हे जीवरक्षक वाचवतात. त्यांना कंपनीऐवजी थेट नोकरीत घ्यावे अशी‌ मागणी आहे. कोविड टाळेबंदीआधी सरकारने ती मान्य केली होती. कोविड टाळेबंदीच्या काळात सरकारने आश्वासनपूर्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लक्ष वेधण्यासाठी हे आहे.

आणखी वाचा:

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूकीची तयारी सुरू -

कर्नाटक सरकारने जनावरांच्या कत्तलींवर बंदी घातल्याने गोव्यात मांसाची कमतरता भासणार? -

संबंधित बातम्या