गोव्यात 17 तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

गोव्यात येत्या 17 फेब्रुवारीपासून जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पड्याची शरक्यता गोवा भारतीय विभागाने वर्तविली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांंमधील किमान तापमानात बदल होणार नाही.

पणजी: गोव्यात येत्या 17 फेब्रुवारीपासून जोरदार मेघगर्जनेसह पाऊस पड्याची शरक्यता गोवा भारतीय विभागाने वर्तविली आहे. उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्ह्यांंमधील किमान तापमानात बदल होणार नाही. गोव्यासहच देशातील बर्‍याच राज्यात हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्ली एनसीआर, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशात दाट धुके पसरण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पश्चिमेकडील भागात पुन्हा एकदा हवामानाचा बिघाड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्तर भारताच्या उंच भागात 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी  गोवा मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, दक्षिण आणि मध्य मराठवाड्याच्या दक्षिण भागांत गारपिट होण्याची शक्यता आहे. तर गोव्यात 17 फेब्रुवारीला जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

येत्या 17 तारखेला विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी परिस्थिती निर्माण होईल,  उत्तर गोव्यात आणि दक्षिण गोव्यात येत्या तीन दिवसात तापमानात कोरड राहणार असल्याचे गोवा हवामान विभागाने सांगितले आहे.  येत्या 12 तासात गोव्याचं तापमान कमाल 33 अंश सेल्सियस आणि किमान 20 अंश सेल्सयस राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  गेल्या 48 तासात गोव्यात नोदविण्यात आलेलं सर्वात कमी तापमान 19 पूर्णांक 8 अंश सेल्सियस होत.

गोव्यातील हॉटेल व्यवसायाकडे भारतीय पर्यटकांची पाठ -

संबंधित बातम्या