Goa Rain Updates: राज्यात तुरळक पावसाची हजेरी

वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करू नये
Goa Rain Updates
Goa Rain UpdatesDainik Gomantak

पणजी: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यात आज 1 डिसेंबर रोजी जोरदार पावसाचा (Goa Rain Updates) इशारा देण्यात आलेला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात जाण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही गोवा हवामान (IMD Goa) खात्यातर्फे देण्यात आलेला आहे.

राज्यातील काही भागात काल रात्री उशीरा तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. गोवा वेधशाळेने आणखी काही दिवस राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

Goa Rain Updates
देशातील 'या' राज्यांमध्ये IMD चा अलर्ट जारी

त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, या भागात मुसळधार पाऊस, गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com