Goa Rain Updates: राज्यात पावसाचा ‘अलर्ट’ पुढील 3 दिवस कायम

पावसाचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण केरळमध्ये समुद्रात जलद हालचाली सुरू आहेत.
Goa Rain Updates: राज्यात पावसाचा ‘अलर्ट’ पुढील 3 दिवस कायम
Goa Rain UpdatesDainik Gomantak

पणजी: राज्यात (Goa) सोमवारी दुसऱ्‍या दिवशीही पावसाने (Rain Updates) हजेरी लावली. साखळी, सत्तरी आणि वाळपई भागात अधिक पाऊस झाला, पण वीज आणि वादळी वारे नव्हते. त्यामुळे दिलासा मिळाला. पुढील शुक्रवारपर्यंत (ता. 19) राज्यात पावसाची शक्यता आहे.

या काळात ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना हवामान वेधशाळेने केली आहे. पावसाचा कालावधी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण केरळमध्ये समुद्रात जलद हालचाली सुरू आहेत.

Goa Rain Updates
Monsoon Update: गोव्यासह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अलर्ट

डिचोलीत पुन्हा तडाखा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाने तडाखा देताना डिचोलीत सर्वत्र जोरदार बरसात केली. कालच्या तुलनेत मात्र आज पावसाचा जोर किंचित कमी होता आणि कालच्याप्रमाणे मेघगर्जनाही नव्हती. आज दुपारी डिचोलीत सर्वत्र पर्जन्यवृष्टी झाली. घरोघरी तुळशी विवाहाची तयारी चालू असतानाच काळोख करीत पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दुपारी साधारण तासभर बरसल्यानंतर पाऊस ओसरला, तरी सायंकाळपर्यंत पावसाळी वातावरण होते. अधूनमधून पावसाची रिपरिप चालू होती. पावसामुळे आजही रस्त्याच्या बाजूने पाणी साचले होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com