कोलवाळ पोलिसांकडून 36 हजारांची दारू जप्त

पोलिसांनी तब्बल 170 लीटर अवैध दारू जप्त केली आहे.
Liquor Seized by Colvale Police
Liquor Seized by Colvale PoliceDainik Gomantak

योगेश मिराशी

म्हापसा : गोव्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आचारसंहितेची काटेकोर अमलबजावणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून गोव्यात ठिकठिकाणी अवैध गोष्टींना आटकाव केला जात आहे. कोलवाळ पोलिसांनी मुशीरवाडा, कोलवाळ येथील एका बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकत हजारोंची दारु जप्त केली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या दारुची किंमत 36 हजारांच्या आसपास असल्याची माहिती आहे. पोलिसांनी तब्बल 170 लीटर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक मंदार परब, हेड कॉन्स्टेबल सुधीर, पोलिस कॉन्स्टेबल संदीप, संतोष व इतर पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Liquor Seized by Colvale Police
2 किलो गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक; पर्वरी पोलिसांची कारवाई

दरम्यान पर्वरी पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. सुमारे 2 लाख किमतीचा 2 किलो गांजा राजकुमार दास (38, र. डिचोली) याच्याकडून भुटकीवाडा, सुकुर, सांगोल्डा रोड इथून जप्त करण्यात आला आला आहे. याप्रकरणी आरोपीला पर्वरी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com