शालिमार एक्स्प्रेसमधून परराज्यात जाणारा मोठा मद्यसाठा जप्त

वास्को रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई
Liquor Seized in Vasco
Liquor Seized in VascoDainik Gomantak

वास्को : वास्को रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात लपवून ठेवलेला मोठा मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. 14,550 रुपयांची देशी-विदेशी बनावटीची दारू वास्को रेल्वे पोलिसांनी मंगळवारी सकाळी जप्त केली. मात्र हा मद्यसाठा ट्रेनमध्ये कुणी ठेवला याची माहिती अजूनही मिळू शकली नाही.

पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को रेल्वे पोलीस रेल्वे स्थानकावर गस्त घालत असताना रेल्वे पोलिसांना दोन हँडबॅग आणि एक ट्रॉली बॅग शालिमार एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात टाकून दिलेल्या निदर्शनास आल्या. ही ट्रेन वास्को रेल्वे स्थानकातून पश्चिम बंगालकडे निघणार होती. आज मंगळवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या बॅगांची झडती घेतली ज्यात मोठा मद्यसाठा आढळून आला.

Liquor Seized in Vasco
चालकाची डुलकी जीवावर बेतली; नावेलीत कारचा भीषण अपघात

शालिमार एक्स्प्रेसमध्ये पोलिसांच्या निदर्शनास दोन बॅग पडल्या असता त्यांनी त्या उघडून पाहिल्या. या लपवलेल्या बॅगेत 105 बाटल्या (प्रत्येकी 750 मिली) रियल व्हिस्की आणि 5 बाटल्या प्रत्येकी (2 लिटर) रॉयल चॅलेंज व्हिस्की आढळली, ज्यांची एकूण किंमत 14,550 रुपये एवढी आहे.

पोलीस उपनिरीक्षक मांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल श्रद्धा नाईक, पोलीस हवालदार एच बी शिवानंदन, चालक किशोर मोरे आणि दोन होमगार्ड यांनी सदर कारवाई केली. जप्त केलेली दारू वास्कोतील मुरगाव उत्पादन शुल्क कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com