Goa Elections: 'लोबोंचा भंडारी समाजाला संपवण्याचा प्रयत्न'

तृणमूल कॉंग्रेस नेते किरण कांदोळकर यांचा मायकल लोबोंवर निशाणा!
Goa Elections: 'लोबोंचा भंडारी समाजाला संपवण्याचा प्रयत्न'
Goa Elections: Michael LoboDainik Gomantak

Goa Elections: गोवा विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून गोव्यातील राजकीय हालचालींनी जोर धरला आहे. नेत्यांच्या पक्षांतराचे सत्र अद्यापही सुरू आहे. माजी मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) आणि पत्नी दिलायला लोबो (Delilah Lobo) यांच्या पक्षांतरच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी भाजपवर नाराज होऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. इथूनच कॉंग्रेसमध्ये (Congress) धूसपूस सुरू झाली.

Goa Elections: Michael Lobo
TMC: गोव्यात भाजपसमोर विरोधकांची मोट!

भाजपच्या मंत्र्याला कॉंग्रेसमध्ये प्रवेश दिल्यामुळे कळंगुट कॉंग्रेस समिती सदस्य आग्नेल फर्नांडिस (Agnel Fernandes), जोजफ सिक्वेरा आणि अँथनी मिनेझिस नाराज झाले होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल आणि मायकल लोबोंबद्दल स्पष्ट नाराजी दर्शवली आणि कॉंग्रेसविरुद्ध एकजूट कॉंग्रेसला हटवण्याचा निर्धार केला. आज या तिघांनी आपल्या 300 समर्थकांसोबत तृणमूल कॉंग्रेसमध्ये (Trinamool Congres goa) प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यादरम्यान टीएमसी नेते किरण कांदोळकर (Kiran kandolkar) यांनी मायकल लोबोंवर घणाघाती टीका केली.

Goa Elections: Michael Lobo
म्हापसा बसस्थानकाच्या कामावरुन मायकल-जोशुआमध्ये जुंपली

ते म्हणाले की, 'गोव्यात मोठ्या प्रमाणात भंडारी समाज वसलेला आहे. मायकल बोलो हे गोव्यातील जनतेसाठी हानिकारक ठरू शकतात. ते गोव्यातील भंडारी समाजाला नष्ट करून संपवण्याच्या मोहिमेवर आहेत. त्यामुळे गोव्यातील जनतेसमोर टीमसीला मतदान करणे हाच एकमेव पर्याय आहे. अशा लोकाना राजकारणातून धुडकावून लावणे गरजेचे आहे.' त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस आणि भंडारी समाजाला संपवण्यासाठी सुपारी दिली असल्याचा आरोपही कांदोळकर यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे भंडारी समाजातील लोकांची मते लोबोंविरुद्ध जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपमध्ये असताना ज्याप्रकारे लोबो यांनी तक्रारसत्र सुरू केले होते, त्यामुळे आधीच भाजपमधले पदाधिकारी आणि भाजप समर्थक जनता लोबोंच्या विरोधात आहे. त्यातच त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसमधील पदाधिकारी त्यांच्या विरोधात केले. याचा अर्थ कॉंग्रेस समर्थकहीकदाचित त्यांच्या विरोधात जाऊ शकतात. किरण कांदोळकर यांच्या व्यक्तव्यानंतर तर आता तृणमूलची समर्थक जनतादेखील लोबो यांचा द्वेष करू शकते की काय? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहेत.

Goa Elections: Michael Lobo
Goa Election: ...तर भाजपविरोधी आघाडीसाठी एकत्र या

मायकल लोबो यांनी भाजप सोडल्यावर भाजप नेत्यांनी देखील त्यांच्यावर तोंडसुख घेतले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री परवा गोवा दौऱ्यावर होते. त्यांनी त्यांच्या संभाषणात लोबोंचा उल्लेख केला. लोबोंना आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडला असे मत त्यांनी व्यक्त केले. गोव्याचे मुख्यमंत्री देखील लोबोंवर बरसले. ते म्हणाले की 'लोबो पक्ष सोडून गेल्यामुळे भाजपवर काडीचाही परिणाम झालेला नाही. उलट निष्ठेने काम करणाऱ्यांनाच पक्ष संधी देईल आणि त्यांच्या पाठीशी असेल'. एकंदरीत भाजप लोबोंच्या राजीनाम्याची वाटच पाहत होता. त्यामुळे आता चारीबाजूंनी लोबोंचे विरोधक वाढल्यामुळे याचा परिणाम पुढे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतील (Goa Assembly Elections 2022) मतांवर होणार का? ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com