लोबो यांचा काँग्रेसच्या प्रचारामध्ये सहभाग; भाजपला जाहीर आव्हान

रविवारी सकाळी मायकल लोबो यांच्या हस्ते साळगाव मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार केदार नाईक यांच्या प्रचाराला सुरुवात झाली.
Michael Lobo
Michael Lobo Dainik Gomantak

पणजी: गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेले कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी काल काँग्रेसच्या जाहीर प्रचारामध्ये सहभाग नोंदवत भाजपला जाहीर आव्हान दिले. आज, सोमवारी ते भाजपच्या आमदारकीचा आणि भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये (Congress) सहभागी होतील, हे आता स्पष्ट झाले आहे. (Michael Lobo to join Congress today)

Michael Lobo
पहिल्यांदाच मनोहर पर्रीकरांच्या चेहऱ्याशिवाय भाजप मैदानात, काय आहे तयारी?

रविवारी सकाळी मायकल लोबो यांच्या हस्ते साळगाव मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार केदार नाईक यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. भाजपचे (BJP) आमदार आणि मंत्री असतानाही विरोधी पक्ष काँग्रेसच्या जाहीर प्रचारामध्ये सहभागी होणारे ते पहिलेच आमदार असतील. भाजपच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे सांगे मतदारसंघाचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनीही कॉंग्रेसचा ‘हात’ पकडल्याने आता काही प्रमाणात कॉंग्रेसचा गड भक्कम बनत चालला आहे.

या मतदारसंघांवर लोबोंचा प्रभाव

बार्देश तालुक्यामध्ये म्हापसा, कळंगुट, शिवोली, साळगाव, हळदोणा, पर्वरी आणि थिवी हे सात मतदारसंघ येतात. या बहुतांश संलग्न मतदारसंघांवर मायकल लोबो यांचा प्रभाव आहे. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोबो यांच्या हस्तक्षेपामुळे शिवोली आणि साळगावमध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते. तर पर्वरी येथेही अपक्ष आमदार निवडून आला होता. त्यामुळे लोबो त्यांचा बार्देश तालुक्यावर ती प्रभाव मानला जातो. त्यांचा काँग्रेसमधला प्रवेश हा भाजपसाठी मोठा झटका आहे.

असे होऊ शकते भाजपचे नुकसान

1) बार्देश तालुक्यातील सात मतदारसंघांवर भाजपने बरेच परिश्रम घेतले असून हे मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

2) कारण साळगाव येथून निवडून आलेले जयेश साळगावकर, पर्वरी येथील अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना भाजपने या अगोदरच पक्षात घेतले आहे.

3) शिवोलीत आमदार विनोद पालयेकर यांच्याशी बोलणी सुरू आहे. ते भाजपच्या वाटेवर आहेत, तर थिवीचे काँग्रेसचे आमदार नीळकंठ हळर्णकर हेही यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

4) त्यांच्याविरोधात मायकल लोबो यांनी आघाडी उघडल्याने भाजपसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

5) म्हापसा येथे सुधीर कांदोळकर यांच्या रूपाने त्यांनी जोशुआ डिसोझा यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

6) कळंगुट मतदारसंघामध्ये भाजपला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.

7) हळदोणे मतदारसंघामध्ये म्हापसा पालिकेचे काही प्रभाग येतात. याशिवाय येथे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन मतदारही आहेत. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात लोबो यशस्वी होऊ शकतात.

Michael Lobo
गोवा विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

लोकांसाठी विकासात्मक कामे करणाऱ्या उमेदवारांची निवड म्हणजेच ‘टूगेदर फॉर बार्देश’ ही संकल्पना आहे. जो उमेदवार लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवेल आणि मतदारसंघासाठी काम करेल, तोच निवडून येईल. बार्देश तालुक्यामधील 6 उमेदवार आम्ही जिंकून आणू. यासाठी लोकांनी एका पक्षाला बहुमताने निवडून आणणे गरजेचे आहे. ज्यामुळे राजकीय घोडेबाजार थांबेल आणि विकासावर लक्ष केंद्रित होईल. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत बोलणी पूर्ण झाली असून उद्या निर्णय होईल.

- मायकल लोबो (Michael Lobo), ग्रामीण विकास आणि घनकचरा व्यवस्थापन मंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com