IIT Goa : सांगेमध्येही आयआयटीविरुद्ध वाढला स्थानिकांचा विरोध

सरकारवर टीका : नागवेनंतर वरकटूतील शेतकऱ्यांचीही प्रकल्पासाठी नकारघंटा
IIT Goa Protest in Sanguem
IIT Goa Protest in Sanguem Dainik Gomantak

IIT Goa : आयआयटीचा शैक्षणिक प्रकल्प केवळ शासकीय जागेत उभारण्यात येईल, कुणाची खासगी जमीन त्यात येत असेल तर‌ त्याच्याशी संवाद साधून योग्य मुल्य‌ देऊन त्याची सहमती मिळवली जाईल, या मुख्यमंत्री आणि आमदारांच्या वक्तव्याला छेद देत नागवे पाठोपाठ वरकटू या गावातील शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आयआयटी नको, अशी हाक दिली आहे. सरकार काही सांगत असले तरी आमच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा या शेतकऱ्यांचा‌ दावा आहे.

सांगे येथील प्रस्तावित आयआयटी शैक्षणिक प्रकल्पाला दिवसेंदिवस अनेक स्थानिक आणि शेतकऱ्यांचा विरोध वाढत आहे. आज वरकटू येथील अडीचशेहून अधिक शेतकऱ्यांनी शेतजमिनीत सभा घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शविला. सभेला वरकटू, कोठारली, पिराराज, नागवे, दांडो आधी भागातील शेतकरी एकत्र जमले होते. यावेळी जोसेफ फर्नांडिस, मेरी फर्नांडिस, मिल्टन फर्नांडिस, शांतू गावकर, कार्लोत कार्व्हालो, कोस्तांव मास्कारेन्हास, फुलामेन डिकॉस्ता व इतरांनी आयआयटी विरोधात आपले विचार व्यक्त केले.

IIT Goa Protest in Sanguem
Land Grabbing Case : 'जमीन हडप प्रकरणात 'त्या' मंत्र्याचे गिरीश चोडणकरांशी साटेलोटे'

प्रकल्प सांगेतच होणार

1 सांगे येथे 4 सप्टेंबरला मुख्यमंत्री म्हणाले होते, की आयआयटी प्रकल्प सांगेतच होणार आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच जागा आयआयटीच्या ताब्यात देण्यात येईल.

2 निश्चित केलेली जागा सरकारच्याच मालकीची असून आयआयटीसाठी दुसऱ्यांकडून जागा घेण्याची आवश्यकता नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले होते.

आमचा लढा सुरूच राहणार

‘निवडणुकीपूर्वी सुभाष फळदेसाई यांनी प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांना शेतात कुंपण घालून देणार असल्याचे सांगितले. मात्र, निवडून येताच शब्द बदलला. शेतकऱ्यांना घाबरविण्यासाठी पोलिसांचा वापर करण्यात येत आहे. पण आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार आहोत,’ असा निर्धार नंदा मापारी यांच्यासह इतरांनी व्यक्त केला.

तर आयआयटी प्रकल्प उभारणारी जमीन सुपीक असताना काजू, डोंगर, शेती बागायती नष्ट करून काय साध्य करू पाहतोय? गुंडगिरी करून प्रकल्प साकारू शकत नाही. आयआयटी कुठेही स्थलांतर करा. पण सांगेतील शांतता आणि शेतकऱ्यांना चिरडून सांगेत मुळीच करू देणार नाही, असे स्थानिक महिला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com