गोव्यात समुद्राच्या गढूळ पाण्यातही देशी पर्यटकांकडून मौज

Goa Beach : सध्या कोलवा तसेच बाणावलीतील अन्य किनारी भागात समुद्राचे पाणी गढूळ आहे. त्याचे कारण माॅन्सुनपूर्वी ढवळला जाणारा समुद्र आहे.
गोव्यात समुद्राच्या गढूळ पाण्यातही देशी पर्यटकांकडून मौज
Goa BeachDainik Gomantak

मडगाव : सध्या कोलवा तसेच बाणावलीतील अन्य किनारी भागात समुद्राचे पाणी गढूळ आहे. त्याचे कारण माॅन्सुनपूर्वी ढवळला जाणारा समुद्र आहे. पण त्याची तमा न करता मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झालेले देशी पर्यटक त्या पाण्यात मजा लुटताना दिसत आहेत. (Local tourists enjoyment in muddy sea water)

जून महिन्यात प्रथमच इतक्या संख्येने पर्यटक आलेले असून त्यामुळे हाॅटेलवालेही समाधान व्यक्त करत आहेत. मे महिना अखेरीस पर्यटकांची संख्या घटू लागल्याने किनारपट्टीतील शॅकवाल्यांनी आवरा आवर सुरू केली होती त्यामुळे ओस पडू लागलेल्या किना-यांवर या देशी पर्यटकांमुळे काही प्रमाणात वर्दळ जाणवली.

दरम्यान, जगभरात टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोव्याने आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आता विविध सेवा देण्याचा निर्धार गोवा टुरिझमने केला आहे. याचाच एक भाग म्हणून हेलिकॉप्टर राईड, सीप्लेन आणि जमिनीसह पाण्यावरही चालेल अशा बसची सेवा पर्यटकांना देण्याचं नियोजन सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com