खोर्जुवे किल्ला परिसरात स्थानिक युवकांचा उच्छाद  

दैनिक गोमंतक
बुधवार, 14 एप्रिल 2021

खोर्जुवे किल्ल्याच्या परिसरात असलेल्या रस्यावर रात्रीच्या वेळी काही युवक मद्यप्राशन करत असतात व त्यांच्यापासून स्थानिक लोकांना उपद्रव होत आहे, अशा तक्रारी आहेत.

म्हापसा : खोर्जुवे किल्ल्याच्या परिसरात असलेल्या रस्यावर रात्रीच्या वेळी काही युवक मद्यप्राशन करत असतात व त्यांच्यापासून स्थानिक लोकांना उपद्रव होत आहे, अशा तक्रारी आहेत. त्या युवकांच्या विरोधात शासकीय यंत्रणेसमोर लिखित स्वरूपात तक्रार केल्यास त्यांच्यापासून स्वत:च्या जीवितास धोका आहे, या भीतीपोटी त्यांच्या विरोधात उघडपणे आवाज काढायला स्थानिक लोक धजावत नाहीत. तो परिसर अतिशय हवेशीर असल्याने दररोज काळोख पडल्यानंतर तिथे काही टारगट स्थानिक तसेच गावाबाहेरील युवक जमा होऊन मद्यप्राशन करीत असतात. काही वेळा त्यांचा गोंगाटही सुरू असतो. (Local youths flock to the Khorjuwe fort area) 

पणजी महापालिकेची ‘ट्रेंडस’वर कारवाई

एखाद्या दुचाकी वाहनावर बसून रस्त्यावरून जाणाऱ्या एकट्यादुकट्या व्यक्तींवर ते मोठमोठ्याने ओरडून शेरेबाजी करीत असतात व कित्येकदा विनाकारण शिव्याही देत असतात. भीतीपोटी त्या व्यक्ती अथवा स्थानिक लोकही त्या युवकांना त्यासंदर्भात जाब विचारण्याचे धाडस करू शकत नाहीत, असे त्या परिसरातील काही लोकांचे म्हणणे आहे. कित्येकदा ते युवक रात्री बारा-एक वाजेपर्यंत तिथे अक्षरश: धिंगाणा घालत असतात. त्याशिवाय मद्याच्या बाटल्या तसेच खाद्यजिन्नसांची वेष्टणे तिथेच टाकून देत असतात. हळदोणे पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ते या परिसरात सातत्याने कायम गस्त घालू शकत नसले तरी त्या भागात अचानक कधीतरी दंगामस्ती करणाऱ्या त्या युवकांना वठणीवर आणू शकतात.

संबंधित बातम्या