Goa: काणकोणात डेंग्यू आणि मलेरिया पसरण्याची भीती

पंचायतीला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले बांधून देण्याची विनंतीही कित्येकवेळा केली गेली पण त्याकडे कानाडोळा करण्यात आला.
Goa: काणकोणात डेंग्यू आणि मलेरिया पसरण्याची भीती
गालजीबाग येथे रहिवाश्यासी संवाद साधतांना रिव्होलुशनरी गोवन्सचे प्रदिप पागीDainik Gomantak

काणकोण: गालजीबाग चर्च (Church) जवळ असलेल्या शेतात (Farm) पावसाचे पाणी साचलेले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहिती प्रमाणे तिथे हायवे (Highway) बांधण्याचे काम सुरू केल्याने आणि कंत्राटदाराच्या बेशिस्त कामांमुळे पावसाळ्यात (Monsoon) येथे हायवे शेजारी असलेल्या शेतात पाणी साठून राहते.

गालजीबाग येथे रहिवाश्यासी संवाद साधतांना रिव्होलुशनरी गोवन्सचे प्रदिप पागी
फोंडले येथील खचलेल्या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

या साठलेल्या पाण्यामुळे आजूबाजूला सर्वत्र डासांची (Mosquitoes) पैदास वाढली आहे‌ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास येत आहे. यामुळे गावात डेंग्यू (Dengue fever) आणि मलेरिया (Malaria) पसरण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. पंचायतीला पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले बांधून देण्याची विनंतीही कित्येकवेळा केली गेली पण त्याकडे कानाडोळा करण्यात आला.

गालजीबाग येथे रहिवाश्यासी संवाद साधतांना रिव्होलुशनरी गोवन्सचे प्रदिप पागी
Goa: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रेवल्युशनरी गोवन्सने केली मागणी

स्थानिकांच्या माहिती प्रमाणे शेताच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर अजूनपर्यंत पथदिवे घातलेले नाहीत. रात्रीच्या वेळी या रस्त्याने चालणे खूपच भीतीदायक आहे. कारण रात्रीच्या वेळी या रस्त्यावर अनेक साप फिरताना दिसतात. स्थानिकांनी यासंदर्भात कित्येकदा गावाच्या पंचायत सदस्यांना तसेच स्थानिक आमदारांला सांगितले. परंतु कुणीही त्यांना मदत केली नाही. असे रेव्होल्युशनरी गोवन्सनच्या कार्यकर्त्याकडे संपर्क साधल्यानंतर आरजी सदस्य प्रशांत पागी आणि संजम नाईक यांनी त्या शेतात आणि रस्त्याच्या शेजारी किटकनाशक फवारणी करण्यात केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com