गोव्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन वाढवला

Lockdown extended till May 31 in Goa
Lockdown extended till May 31 in Goa

पणजी: गोव्यातील संचारबंदी (Lockdown) आता 31 मे पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (CM Dr. Pramod Sawant) यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर या निर्णयाची घोषणा केली त्यांनी सांगितले की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी (Corona third wave) लढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल स्थापण्यात आलेले आहे. आज त्या कृती दलाची पहिली बैठक होणार आहे. (Lockdown extended till May 31 in Goa)

गोव्यात सध्या जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत उघडी आहेत. कार्यालय व उद्योगधंदेही सुरू आहेत. लग्न आदी धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असून मासळी मार्केटही बंद ठेवण्यात आलेले आहे. यापूर्वी रविवारी पहाटे पर्यंत संचारबंदी लागू असल्याचा आदेश जारी करण्यात आलेला होता आता त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. गेले काही दिवस कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण घटत चालले आहे तसेच कोरोनाची रुग्ण संख्याही रोडावत चालली आहे.

संचारबंदीमुळे हे शक्य झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे . मंत्रिमंडळाच्या बैठकीत संचार बंदी वाढवावी अशी मागणी अनेक मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे यांनीही संचारबंदीत वाढ केली पाहिजे असे मत काल व्यक्त केले होते. त्यानुसार आता 31 मे पर्यंत गोव्यातील संचार बंदी वाढवण्यात आलेली आहे. गोव्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला कोरोनाची लागण झालेली नाही असे 48 तासात घेतलेले प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com