Lockdown: गोव्यातील मांसविक्रेते चिंतेत; बीफसाठी कर्नाटकावर अवलंबून

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 28 एप्रिल 2021

गोव्यातील राज्यातील चिकन विक्रेत्यांना महाराष्ट्रातून आयात करण्याची सोय असली, तरी मांस विक्रेते मात्र बीफसाठी प्रामुख्याने कर्नाटकावर अवलंबून आहेत. गोव्यातील मांसविक्रेते त्यामुळे चिंतेत सापडले आहे.

पणजी : कर्नाटकाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चौदा दिवसांचा राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर केला असून तो मंगळवार रात्रीपासून सुरू झालेला आहे. यामुळे राज्यात भाज्यांचा तुटवडा भासण्याच्या शक्यतेबरोबर मांसाचा तुटवडाही भासण्याची शक्यता आहे. गोव्यातील मांसविक्रेते त्यामुळे चिंतेत सापडले असले, तरी बीफचा पुरवठा सुरळीत राहण्याची आशा ते बाळगून आहेत.(Fish sellers in Goa depend on Karnataka for beef)

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सरणांची तयारी करत आहेत? 

राज्यातील चिकन विक्रेत्यांना महाराष्ट्रातून आयात करण्याची सोय असली, तरी मांस विक्रेते मात्र बीफसाठी प्रामुख्याने कर्नाटकावर अवलंबून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बेळगावातील काही पुरवठादारांनी त्यांच्याकडे गुरे उपलब्ध असेपर्यंत मांसाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे साठा असेपर्यंत राज्यात बीफचा पुरवठा‌ होणार आहे. त्याशिवाय कर्नाटकातून गोव्याला होणाऱ्या अत्यावश्यक पुरवठ्याच्या सेवांमध्ये अडथळा येणार नाही असे आश्वासन देण्यात आलेले आहे. यामुळे मांस विक्रेत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

गोवेकरांसाठी पणजी मार्केटचा एकच दरवाजा खुला 

राज्यातील चिकन विक्रेते मात्र तेवढी चिंतीत नाहीत. कारण त्यांना गरज निर्माण झाल्यास महाराष्ट्रावर अवलंबून राहता येते. कित्येक चिकन विक्रेते पुरवठ्यात समस्या भेडसावू नयेत यासाठी महाराष्ट्रातून चिकन आयात करत आहेत. काही महिन्यांपूर्वी बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाच्या घटना घडल्यानंतर कित्येक चिकनविक्रेत्यांनी कर्नाटकऐवजी महाराष्ट्रातून कोंबड्या आयात करण्यावर भर दिलेला आहे.

गोव्यातील 13 दवाखाने बंद; साडेतीन लाख कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे वळणार

संबंधित बातम्या