गोव्यात लागणार लॉकडाऊन? मुख्यमंत्री म्हणाले..

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवरही लक्ष ठेवले जात आहे. तसेच, राज्यातील कोरोना प्रकरणात दररोज होणारी वाढही नोंदवली जात आहे.

पणजी : राज्यातील कोरोना परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष असून तूर्तास कोणतेही निर्बंध किंवा लॉकडाऊन लावण्याचा विचार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या आणि बळकटीकरणाच्या कामाच्या पायाभरणी कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 

बाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव

शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवरही लक्ष ठेवले जात आहे. तसेच, राज्यातील कोरोना प्रकरणात दररोज होणारी वाढही नोंदवली जात आहे. त्यामुळे राज्यात सध्या कोणतेही निर्बंध, कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याच्या विचार नसल्याचे यावेळी प्रमोद सावंत यांनी सांगितले. मी कबूल करतो की राज्यातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ हॉट आहे. दररोज 250 हूं अधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. मात्र  आम्ही चाचणी सुविधा वाढवल्या असल्याचेही प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. 

गोवेकरांनो नियम मोडण्याआधी जाणून घ्या नवा वाहतुक कायदा

परंतु सरकारने  केवळ निर्बंध लादण्याऐवजी  नगरीकणी स्वत: च्या सुरक्षेचा विचार केला पाहिजे.  कोरोनाचा उद्रेक होऊ नये यासाठी गोव्यातील जनतेने कोविड-19 च्या निकषांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून दैनंदिन प्रकरणांमध्ये घट झाली होती. मात्र गोव्यात मार्च महिन्यापासून पुन्हा नवीन प्रकरणांमध्ये वाढ हॉट असून टी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सावंत यांनी सांगितले.  

दरम्यान रविवारी, राज्यातील सक्रिय प्रकरणांत वाढ झाली आसून ती  2077 वर पोहचली आहे.  गोव्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 59,315 इतकी झाली आहे. गेल्या चोवीस तासात 247 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून आता एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2,180 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 142 रुग्ण बरे झाले असून 2  मृत्यू ची नोंद झाली आहे. 

संबंधित बातम्या