गोव्यात शुक्रवारपासून तीन दिवस लॉकडाऊन 

विलास महाडिक
बुधवार, 15 जुलै 2020


राज्यामध्ये काल कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक (१७०) गाठल्याने तसेच मृत्यूची संख्या १८ वर पोहचल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे.

पणजी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिव होणारी वाढ लक्षात घेऊन येत्या शुक्रवारी १७ जुलैपासून ते १९ जुलैपर्यंत तीन दिवसांचा लॉकडाऊन संपूर्ण राज्यभर जाहीर केला आहे. तसेच आज बुधवार १५ जुलैपासून ते १० ऑगस्ट २०२० पर्यंत नेहमी रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. फक्त रात्रीच्यावेळी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पाळीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र दाखविल्यास परवानगी दिली जाईल. या काळात कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले. राज्यामध्ये काल कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येने उच्चांक (१७०) गाठल्याने तसेच मृत्यूची संख्या १८ वर पोहचल्याने विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होत आहे. राज्यातील जनताही धास्तावली आहे. कोरोना बाधित रुग्णांची साखळी मोडण्यासाठी तसेच जनतेकडून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होत नसल्याने हा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे मात्र लोकांकडूनही सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. 

 

 

संबंधित बातम्या