Lokotsav 2023: गोवेकरांना हस्तकला, कपडे, खाद्यपदार्थांची मोहिनी

लोकोत्सव 2023’ मध्ये विविध हस्तकला आणि ज्वेलरी स्टॉल्स महिलांना आकर्षित करत आहेत.
Goa Lokotsav 2023
Goa Lokotsav 2023 Dainik Gomantak

Lokotsav 2023: ‘लोकोत्सव 2023’ मध्ये विविध हस्तकला आणि ज्वेलरी स्टॉल्स महिलांना आकर्षित करत आहेत. तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खवय्यांच्या तोंडाला पाणी आणत आहेत.

कला अकादमीच्या दर्यासंगमवर उभारलेल्या भव्य आणि कलात्मकदृष्ट्या देखण्या रंगमंचावर विविध राज्यांतील लोकनृत्ये व लोककलांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक गर्दी करतात.

मात्र विद्युत पुरवठा वेळोवेळी खंडित होण्याचे प्रकार घडत होते.

  छोले भटुरे, जोधपुरी दही वडा, दाल बाटी, प्याज की कचोरी, मूंगदाल हलवा, पनीर आलू टिकी, मावा कचोरी अशा राजस्थानच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा लोकांनी आस्वाद घेतला.

  लखनऊची केसरिया रबडी, लच्छा कुल्फी, केसरिया लस्सी, गुलाब जामून अशा पदार्थांचे स्टॉल्सही खवय्यांना आकर्षित करत आहेत.

Goa Lokotsav 2023
Walking The Beat Police: कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी थिवीमध्ये “वॉकिंग द बीट”

 मूळ सांगली येथील साधना गायकवाड यांच्या स्टॉलवर कोल्हापुरी तांबडा रस्सा, बैंगन मसाला, कोल्हापुरी मिसळ, बेसन पिठलं, चिकन रस्सा, थालीपीठ, भाकरी असे खास पदार्थ आहेत.

  गोव्यातील स्टॉल्सवर चिकन सागोती, भजी, वडा, फिश करी असे अनेक पदार्थ आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com