लोलयेत परप्रांतीयांमुळे घबराट

Dainik Gomantak
सोमवार, 18 मे 2020

माड्डीतळप येथे लोकवस्ती असल्याने येथील नागरीकाना साथीच्या रोगाची भिती निर्माण झाली आहे.हीच परिस्थिती पोळे तपासणी नाक्यावर आहे.त्यामुळे येथील नागरीक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत.

काणकोण

कर्नाटकातून गोव्यात येणाऱ्या गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या मजूर व नागरीकांकडून लोलयेवासीयाच्या जीविताला धोका संभवण्याचा धोका आहे त्यासाठी सरकारी यंत्रणेने उपाययोजना करण्याची मागणी लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी केली आहे. गोव्यातून कर्नाटकात जाणाऱ्या मजूराची नावनोंदणी व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यासाठी त्यांना लोलये पंचायत क्षेत्रातील माड्डीतळप येथे उघड्यावर थांबवण्यात येते. दिवसाकाठी शेकडो नागरीक या ठिकाणी येत असतात  ते सर्व उघड्यावरच नैसर्गिक विधी करतात त्याशिवाय या ठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे.माड्डीतळप येथे लोकवस्ती असल्याने येथील नागरीकाना साथीच्या रोगाची भिती निर्माण झाली आहे.हीच परिस्थिती पोळे तपासणी नाक्यावर आहे.त्यामुळे येथील नागरीक भितीच्या सावटाखाली वावरत असल्याचे लोलये पंचायतीचे सरपंच शैलेश पागी यांनी सांगितले. पोळे व माड्डीतळप येथे कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे कचऱ्याची उचल न केल्यास न्यायव्यवस्थेकडून पंचायतीवर दंडात्मक कारवाई होते माड्डीतळप येथे पाणी व शौचालयांची सोय नाही त्यामुळे उघड्यावर नैसर्गिक विधी उरकण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यासाठी कर्नाटकातून येणाऱ्या व कर्नाटकात गोव्यातून जाणाऱ्या मजूराना नावनोंदणी व अन्य सोपस्कार पूर्ण करण्यासाठी माड्डीतळप येथे थांबवून न ठेवण्याची मागणी अजय लोलयेकर यांनी केली आहे.

आजपासून नवीन व्यवस्था....

लोलये पंचायत क्षेत्रातील  माड्डीतळप येथे होणारी कर्नाटकात जाण्यासाठी होणारी मजूराची गर्दी व अन्य  गैरसोयी टाळण्यासाठी  सोमवार पासून कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या माड्डीतळप येथे आणून  या मजूराना परस्पर कर्नाटकात नेण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.दुसऱ्या दिवशी जाणाऱ्या मजूर व नागरीकाची माहिती आगाऊ पहिल्या दिवशी मागवून घेण्यात येऊन त्याची यादी पहिल्याच दिवशी तयार करण्यात येणार आहे.त्याप्रमाणे कर्नाटक परिवहनाच्या गाड्यासाठी आगाऊ मागणी करण्यात येणार आहे.यापूर्वी मजूर गाड्या घेऊन आल्यानंतर नांवनोंदणी व अन्य सोपस्कार करण्यासाठी त्यांना माड्डीतळप येथे थांबवून घेण्यापलिकडे पर्याय नव्हता.सोमवारी कर्नाटकातील मजूराना नेण्यासाठी आगाऊ तीन कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाड्यांची मागणी करण्यात आली आहे.कर्नाटकात जाणाऱ्या मजूराना घेऊन येणाऱ्या गाड्याना कोणत्याच परिस्थितीत सकाळी ९.३० पूर्वी माड्डीतळप येथे न येण्याची ताकीद देण्यात आली आहे.त्याच्या यादीची तपासणी केल्यानंतर त्यांना परस्पर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या गाड्यात बसवण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यामुळे लोलये पंचायतीचा प्रश्न सुटण्याची अपेक्षा असल्याचे मामलेदार विमोद दलाल यांनी सांंगितले.

पाच हजारपेक्षा जास्त कर्नाटकी रवाना..

आता पर्यंत पांच हजार पेक्षा जास्त कर्नाटकी मजूर आपल्या गावी रवाना झाले आहेत. काल दोनशे मजूर कर्नाटकात गेले.आतापर्यंत काणकोण उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे गावी परतण्यासाठी ३२४० मजूरानी अर्ज दाखल केले होते त्यामध्ये नेपाळी ३४७,काश्मिरी २४६, बिहार ९७६ उत्तराखंड ३४० व अन्य राज्यातील कामगार आहेत असे काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रितीदास गावकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या