ऑनलाईनद्वारे ११.३६ लाखांची फसवणूक केलेल्या संशयिताला मुंबईत अटक  

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

वीस लाखांचे व्याजमुक्त कर्ज देण्याचे आमिष दाखवून ११.३६ लाखांना लुटणाऱ्या अली ऊर्फ महम्मद मुमताज या तरुणाला भांडुप (रा. मुंबई) येथून अटक करण्यात आली

पणजी : वीस लाखांचे व्याजमुक्त कर्ज देण्याचे आमिष दाखवून ११.३६ लाखांना लुटणाऱ्या अली ऊर्फ महम्मद मुमताज या तरुणाला भांडुप (रा. मुंबई) येथून अटक करण्यात आली. त्याने ऑनलाईनवरून तक्रारदाराशी संपर्क साधून त्याला कर्ज देण्याचे आमिष दाखवले होते. त्याच्या या आमिषाकडे आकर्षित होऊन तक्रारदारने कर्ज मिळण्यासाठी संशयिताच्या बँक खात्यावर विविध कामासाठी वेळोवेळी रक्कम जमा केली होती.

सायबर गुन्हे कक्षाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईनवरून व्याजमुक्त कर्ज देण्याचे आमिष दाखवून लुटल्याची तक्रार या कक्षाकडे आली होती. त्याने २० लाखाच्या कर्जासाठी ऑनलाईनवरून अनोळखी व्यक्तीकडे केली होती. तक्रारदारने या व्यक्तीशी केलेल्या व्यवहाराची माहिती जमा केल्यानंतर या कक्षाच्या पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. ही व्यक्ती मुंबईतील भांडुप भागात राहत असल्याचे उघड झाले. त्यानंतर गोव्यातून पोलिस पथक मुंबईत जाऊन तेथील भांडुप पोलिसांची मदत घेतली. त्याल भांडुप येथे त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले व गोव्यात आणण्यात आले.

या संशयिताविरुद्ध मुंबईत अनेक पोलिस स्थानकामध्ये गुन्हे नोंद आहेत. संशयित अली मुमताज याने तक्रादराला २० लाखाचे कर्ज व्याजमुक्त देण्याचे कबूल केले होते. या कर्जाच्या प्रक्रियेसाठी शुल्क सेवा, प्रक्रिया शुल्क व कर भरण्यासाठी वेळोवेळी रक्कम मागवून घेतली व तक्रारदारने ती वेळोवेळी त्याने दिलेल्या बँक खात्यावर जमा केली. मात्र काही दिवसांनंतर संशयिताने तक्रारदाराशी संपर्क साधण्याचे बंद केले तसेच कर्ज देण्याबाबतही विषय टाळू लागला. त्यामुळे त्याचा संशय तक्रारदाराला आला व त्याने तक्रार दाखल केली होती.

संबंधित बातम्या