लॉर्ना-ख्रिस पेरी 'वाद' पणजी न्यायालयाच्या पिंजऱ्यात

वेगळे वळण: वडिलांची बदनामी केल्याबद्दल पुत्र ग्लेन पेरीकडून खटला
लॉर्ना-ख्रिस पेरी 'वाद' पणजी न्यायालयाच्या पिंजऱ्यात
Panaji CourtDainik Gomantak

पणजी: नामवंत संगीतकार ख्रिस पेरी तसेच प्रसिद्ध गायिका लॉर्ना यांच्या संबंधांवर आजवर बरेच चर्वितचर्वण झाले आहे. परंतु त्यांचे नेमके संबंध कसे होते आणि त्यांच्यात वितुष्ट आले होते का, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु ख्रिस पेरी यांचे अमेरिकास्थित पुत्र ग्लेन पेरी यांनी आता वडिलांची बदनामी केल्याबद्दल लॉर्ना यांच्याविरुद्ध पणजीच्या न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

‘‘लॉर्ना यांनी माझ्या वडिलांची प्रचंड बदनामी चालवली आहे. यापूर्वी मी त्यांना इशारा देऊनही पाहिला. परंतु त्यांची आगळीक सुरूच राहिल्याने मला नाईलाजाने खटला दाखल करावा लागत आहे’, अशी माहिती ग्लेन पेरी यांनी ‘गोमन्तक’ला दिली. जाझ संगीतात ग्लेन पेरी हेसुद्धा नावलौकिक कमावून आहेत.

Panaji Court
गोव्यातील दूध उत्पादकांना आजपासून दरवाढ!

1960 च्या दशकात ख्रिस पेरी आणि लॉर्ना यांची जोडी खूप गाजली होती. कोकणी चित्रपट तसेच कांतारा या क्षेत्रामध्ये या जोडीने खूप काम केले आहे. जोपर्यंत लॉर्ना या ख्रिस पेरी यांच्या सान्निध्यात होत्या, तोपर्यंत त्यांनी खूप नावलौकिक मिळवला. परंतु त्यानंतर त्यांच्यात वितुष्ट आले आणि 80 च्या दशकात लॉर्ना अक्षरश: अंतर्धान पावल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच काळानंतर लॉर्ना यांनी ख्रिस पेरींवर आरोप केले.

Panaji Court
केबल तुटल्याने पणजी अंधारात

...त्यामुळे पेरी कुटुंबामध्ये उठले वादळ

ख्रिस पेरी यांनी बॉलिवूडच्या नामवंत संगीतकारांबरोबर वाद्यवृंद संचालक म्हणून काम पाहिले. 80 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गोमंतकीय कोकणी संगीताचा बोलबाला होता. गोमंतकीय संगीताला विशिष्ट डूब देऊन हिंदी चित्रपटसृष्टीत नेण्यात पेरी यांचा महत्त्वाचा वाटा होता. गोव्यात दरवर्षी ते वाद्यवृंद घेऊन येत असत. त्यामध्ये लॉर्ना या त्यांच्या महत्त्वाच्या गायिका असत. ख्रिस पेरी आणि लॉर्ना यांच्या जीवनावर अलीकडेच एक कोकणी सिनेमाही येऊन गेला आहे. त्यांचे संबंध मधुर राहिले असले तरी लॉर्ना यांच्या आरोपांनंतर पेरी यांच्या कुटुंबात वादळ उठले.

लॉर्ना-पेरी जोडीची संगीत क्षेत्रात चर्चा: ख्रिस पेरी यांनी आपल्याला इतर संगीतकारांकडे गाऊ दिले नाही, तसेच आपले करिअर उद्‌ध्वस्त केले, असे त्यांचे आरोप होते. ख्रिस पेरी यांनी जरी या आरोपांना उत्तर दिले नसले तरी लॉर्ना आणि पेरी यांचे संबंध संगीत क्षेत्रामध्ये नेहमीच चवीने चघळले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.