शेतकापणी यंत्रणा नसल्याने शेतीचे नुकसान

farmer is working in farm
farmer is working in farm Dainik Gomantak

प्रियोळ, 

गेल्या आठवड्यात बांदिवडे ग्रामपंचायत क्षेत्रात अवेळी कोसळलेल्या जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे कापणीला तयार झालेली शेती पावसाच्या पाणी आणि वाऱ्यामुळे शेतात आडवी पडली. त्‍यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापणीसाठी तयार झालेली शेतीसाठी योग्यवेळी शेतकापणी यंत्रणा उपलब्ध झाली नसल्याने हे नुकसान भोगावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त करताना सांगितले.

ज्या भागात कापणीसाठी तयार झालेली शेतीची योग्यवेळी कापणी न केल्याने ती शेती आडवी पडून जमिनीला लागल्याने त्या भाताना अंकुर (कोंब) येऊन मोठी नुकसानी झाल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. बांदिवडे ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेती असून त्यातील काही शेती लागवडीखाली आणली जाते. तर बरीच शेती पडिक ठेवलेली असते. बरेच शेतकरी आपली शेती वायंगणी शेतीची लागवड करतात व पावसाळ्यात शेतीची लागवड केली जात नाही. हे शेतकरी बराच खर्च करून शेतीची लागवड करतात त्यात अवेळी पाऊस, आणि शेत कापणी यंत्रणेचा अभाव असल्याने तोटा शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. शेत कापणीचे एकच यंत्र असल्याने ते सगळीकडे पोहोचणे उशीर होत असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. संबंधित खात्याने आणखी यंत्रणा पाठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com