Government of Goa: ‘प्रशासन आपल्या दारी’ उपक्रमात तक्रारींचा खच

बहुतांश पंचायती आणि पालिकांमध्ये अधिकारी उपस्थित
Government of Goa
Government of GoaDainik Gomantak

Government of Goa राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी अभियान म्हणून ‘प्रशासन आपल्या दारी’ची घोषणा करत शुक्रवारी मंत्र्यांना तालुक्याच्या ठिकाणी धाडले होते.

आज प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंपूर्ण मित्रांना गावोगावच्या पंचायती आणि पालिकांमध्ये हजर राहून समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले होते.

त्याप्रमाणे अपवाद वगळता सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांनी सेवा बजावली. यावेळी लोकांनी रस्ते, पाणी, आरोग्यविषयक तक्रारी उपस्थित केल्या.

मूलभूत प्रश्‍नांवर चर्चा

बहुतांश पंचायतींमध्ये लोकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रामुख्याने उत्तर गोेव्यात पाणी, आरोग्य, रस्ते, यासारख्या मूलभूत प्रश्‍नांबाबतच अधिक समस्या मांडण्यात आल्या. याशिवाय कृषी कार्ड, दिव्यांग कार्ड, सॉईल टेस्टिंग कार्ड, यासारख्या योजनांबाबतही लोकांनी विचारणा केली.

बार्देशात अधिकाऱ्यांची पाठ

बार्देश तालुक्यात अनेक पंचायतींमध्ये लोक अधिकाऱ्यांची वाट पाहून थकले आणि नंतर कंटाळून त्यांनी घरचा रस्ता धरला. यावेळी लोक नागरिक सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडताना दिसत होते.

शिवोलीपासून सडये आणि सडयेपासून ओशेलच्या पंचायतीत सरकारी अधिकारी वेळेवर उपस्थित न राहिल्याने कार्यक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. हा प्रकार अत्यंत हास्यास्पद असून या कार्यक्रमाच्या नावाने लोकांच्या डोळ्यांना पाने पुसण्याचा प्रकार होता, असे ग्रामस्थांनी सांगितले.

डॉ. प्रमोद सावंत यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीला आज चार वर्षे पूर्ण झाली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी राज्य सरकारने पूर्वीच्या ‘सरकार आपल्या दारी’ अभियानात बदल करत ‘प्रशासन आपल्या दारी’ची घोषणा करत अंमलबजावणीही केली.

सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने आपल्या सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वयंपूर्ण मित्र म्हणून नेमणूक केली आहे. हे अधिकारी शनिवारी संबंधित पंचायतींमध्ये हजर राहून केंद्र आणि राज्य सरकारच्या सामान्य नागरिकांसाठीच्या विशेष योजना गावांसाठीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्न करतात.

Government of Goa
Margao Fire: मडगांव बसस्थानकानजीक कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल

गेल्या तीन वर्षांपासून हे अभियान सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी या अभियानाचे कौतुक करत इतर राज्यांनी याचे अनुकरण करावे, असेही म्हटले होते. त्यानुसार काही राज्ये या योजनेची त्यांच्या राज्यात अंमलबजावणी करत आहेत.

आसाम राज्याने या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक या योजनेची माहिती मिळवण्यासाठी पाठवले होते. या योजनेला धरूनच आज स्वयंपूर्ण मित्र आणि आयएएस अधिकाऱ्यांना राज्यातील 191 पंचायतींमध्ये सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत प्रत्यक्ष हजर राहून लोकांच्या समस्या, प्रश्‍न आणि गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी पाठवले होते.

बहुतांश पंचायतींमध्ये यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. सरपंच, उपसरपंच आणि पंच यांच्यासह ग्रामसचिवांनी यावेळी उपस्थित राहावे, असे निर्देशही होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com