बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद
Low response to the state bus transportation

पणजी: कदंब वाहतूक महामंडळाने टाळेबंदी उठल्यानंतर शेजारील राज्यात सुरू केलेल्या मोजक्याच बस वाहतूक सेवेला महिना ओलांडला तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. किंचतीशे लोक बसेसमध्ये वाढले असून यापूर्वी ३० टक्केच प्रवासी मिळत होते. याशिवाय कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारनेही प्रवासी मिळत नसल्याने आपल्या बसेस बंद केल्याची माहिती मिळाली आहे.

कदंब वाहतूक महामंडळाने टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण या ठिकाणी, तर कर्नाटकात बेळगाव आणि कारवार या ठिकाणी बसेस सोडल्या. जेणेकरून गोव्यात येणारे कर्मचारी या बसेसनी दररोज ये-जा करू शकतील, असे महामंडळाला वाटले. परंतु अनेकांच्या कोरोनाच्या टाळेबंदीत नोकऱ्या गेल्याने प्रवाशांची संख्या कमी आहे. कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी सांगितले की, एक महिना झाला तरी म्हणावा तेवढा प्रतिसाद बसेसना मिळत नाही.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com