चालत्या गाडीवर फांदी पडूनही  सुदैवाने चालक बचावला 

car
car

पणजी

पणजी महापालिकेने पावसाळ्यापूर्व कामे करताना पणजी शहरातील रस्त्याच्या बाजूने असलेल्या जुन्या झाडांच्या फांद्या तोडल्या होत्या. ही झाडे जुनी असल्याने १८ जून रस्त्यावरील एचडीएफसी कार्यालयासमोर आज झाडाची फांदी चालत्या चारचाकी वाहनावर पडली मात्र सुदैवाने वाहन चालक बचावला. या फांदीमुळे चारचाकी व उभ्या करून ठेवलेल्या तीन दुचाकींचे नुकसान झाले. 
ही घटना प्रत्यक्षात पाहणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, झाडाची फांदी पडण्यापूर्वी एक दुचाकी तरुणी तेथून गेली व त्या पाठोपाठ चारचाकी गाडी जात होती. ही फांदी गाडीवर पडल्याने मोठा आवाज झाला व आजूबाजूला असलेल्या लोकांनी गाडीतील चालक याला बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आल्यावर पणजी अग्निशमन स्थानकाचे अधिकारी पर्रीकर हे घटनास्थळी पोहचले. गाडीवर पडलेली फांदी कापून बाजूला करण्यात आली या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले नाही. उभ्या करून ठेवण्यात आलेल्या तीन दुचाकी या फांदीच्या धक्क्याने खाली कलंडल्या. त्याचेही किरकोळ नुकसान झाले. 
पणजीतील १८ जून रस्ता हा नेहमीच गजबजलेला व या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावर झाडाची फांदी पडल्याने वाहतूक ठप्प झाली. वाहनांच्या रांगा लागल्याने ही वाहतूक पणजी मार्केटच्या दिशेने वळविण्यात आली. सुमारे अर्ध्या तासानंतर झाडाची फांदी हटविण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या रस्त्याच्या बाजूला अनेक जुनी झाडे असून त्यांच्या फांद्याही कमजोर झाल्या आहेत. त्यामुळे या फांद्या वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांनाही धोकादायक बनल्या  आहेत. 

goa goa goa 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com