Luizinho Faleiro: काँग्रेसमध्ये दुःख सहन केले म्हणत...

मी काँग्रेसमध्ये दुःख भोगले असे विधान करत काँग्रेसचे नेते लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली आहे
Luizinho Faleiro: काँग्रेसमध्ये दुःख सहन केले म्हणत...
Luizinho Faleiro attcaks on congress Dainik Gomantak

'मी काँग्रेसमध्ये दुःख भोगले, मात्र गोमंतकीयांना मला या दुःखापासून दूर करायचे आहे. असे विधान करत काँग्रेसचे नेते लुईझिन फालेरो (Luizinho Faleiro) यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार टीका केली आहे. ते पक्ष सोडणार आहेत हे आता जवळपास निश्चित झाले आहे. आणि अशातच त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांना हात घालत मी जे दुःख सहन केले आहे ते जर जास्त असेल तर मग काँग्रेसने (Goa Congress) जे दुःख राज्याला दिला आहे त्याचे काय असेल असा सवालहि त्यांनी केला आहे. आता मी हे दुःख संपवून गोव्यात एक नवीन पहाट आणणार आहे असे सांगत त्यांनी आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा दाखवून दिली आहे. (Luizinho Faleiro attcaks on congress)

त्याचबरोबर माजी मंत्री मिकी पाशेको (Mickey Pashko) यांनी ‘असे कुचकामी म्हातारे पक्ष सोडून जात असतील तर पक्षासाठी ते चांगलेच’ अशी प्रतिक्रिया दिली होती त्यांच्या या विधानाला उत्तर देत त्यांनी आज 'मी वृद्ध असू शकतो, पण माझा रक्त तरुण आहे 'असे म्हणत त्यांनी मिकी पाशेको याना जोरदार प्रतिउउतर दिले आहे.

पश्चिम बंगालचा झंझावात असलेल्या ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस गोव्यात आज सोमवारी प्रचंड मोठा धमाका करण्याच्या तयारीत असून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार असल्याचे आज स्पष्ट झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी परिवाराला निकट असलेले लुईझिन फालेरो आज आपल्या मोठ्या समर्थक गटासह तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज बोलताना ममता बॅनर्जींचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Luizinho Faleiro attcaks on congress
Goa Politics: फालेरो यांच्या राजीनाम्यानंतर काय...

ममता बॅनर्जी या महिला सबलीकरणाचे प्रतीक आहेत, त्या विभाजक शक्तींना लढा देत आहेत. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे. असे सांगत त्यांनी दीदींचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.