Lumpy Disease: लम्पी रोगाविरुद्ध त्वरित उपाययोजना करा अन्यथा...

दूध उत्पादकांना मिळणारी आधारभूत किंमत गेले नऊ महिने मिळालेली नाही. या योजनेसाठीचे अर्जच संबंधित खात्यात उपलब्ध नाहीत.
Lumpy Disease
Lumpy DiseaseDainik Gomantak

Lumpy Disease: गोव्यात गुरांना लम्पी रोगाची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला सुरवात झाली असून या रोगामुळे गुरे दगावण्याचे प्रकार होत असल्याने दूध उत्पादकांना अतोनात नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे सरकारने लंपी रोगाचा मुकाबला करताना युद्धपातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी झाली.

तसेच, दगावल्या गेलेल्या गुरांप्रती दूध उत्पादकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखिल गोवा दूध उत्पादक उत्कर्ष संघटनेने केली आहे. दूध उत्पादकांप्रती सरकारकडून अनास्थाच दर्शवल्यास शेवटी रस्त्यावर येण्याची पाळी दूध उत्पादकांवर येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, लंपी रोगामुळे दुधावर कोणताच विपरित परिणाम होत नसून दूध सुरक्षित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. फक्त या रोगामुळे गाईंची दूध देण्याची तसेच प्रजननाची क्षमता कमी होते, असे नमूद करण्यात आले.

या संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकळ्येकर तसेच शिवानंद बाक्रे व विनोद जोशी हे अन्य पदाधिकारी फोंड्यातील पत्रकार परिषदेला उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी राज्यात सध्या दूध उत्पादकांना सतावणाऱ्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला.

सरकार दूध उत्पादकांना दिलासा देण्यात अपयशी ठरले असून सरकारी यंत्रणेची अनास्थाच त्याला कारणीभूत असल्याचे संजीव कुंकळ्येकर यांनी सांगितले.

सद्यस्थितीत दूध व्यवसाय परवडत नाही. पशुखाद्य, चारा गुरांना उपलब्ध होत नसल्याने दूध उत्पादकांची धावपळ होत आहे. दर वाढलेले आहेत,

त्यातच कमतरता असल्यामुळे गुरांच्या खावडीवर परिणाम होत असून लंपी व इतर रोगासाठी केंद्र सरकारकडून लसी उपलब्ध केल्या तरी त्या गोवा राज्यात देण्यासाठी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. लंपी रोग भटक्या गुरांत जास्त पसरला असल्याचीही माहितीही देण्यात आली.

Lumpy Disease
Goa Government: विधिमंडळाविरोधात रॉड्रिग्जच्या अर्जावर 13 फेब्रुवारीला निर्णय, वाचा नक्की प्रकरण काय ?

दूध उत्पादकांना मिळणारी आधारभूत किंमत गेले नऊ महिने मिळालेली नाही. या योजनेसाठीचे अर्जच संबंधित खात्यात उपलब्ध नाहीत. अर्ज छापण्यासाठी सरकारकडे पैसेच नाहीत,

त्यामुळे सरकारची आर्थिक स्थिती किती दयनीय झाली आहे, त्याची प्रचिती येते असे सांगून ही स्थिती अशीच सुरू राहिली तर दूध उत्पादकांना रस्त्यावर येण्यापासून पर्याय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com