Lumpy Virus: सत्तरीतील भटक्या गुरांमध्ये लम्पीसदृश रोगाची लक्षणे

पशुपालकांत भीती : योग्य उपचार झाल्यास टळू शकतो धोका
Lumpy Virus
Lumpy VirusDainik Gomantak

Lumpy Virus: सत्तरी तालुक्यात रस्त्यावर फिरत असलेल्या भटक्या गायी, बैल यांच्यावर लंपीसदृश रोगाची लक्षणे आढळून आलेली आहेत. बुधवारी सकाळी होंडा येथे पेट्रोल पंपजवळ रस्त्यावर फिरताना लम्पीसदृश गाय दिसून आली. ‘लम्पी स्किन डिसीज’ असे या रोगाचे नाव असून मुख्यत: या रोगाचा पाळीव प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत आहे.

लम्पी स्किन डिसीज हा विषाणूजन्य रोग असल्यामुळे त्याचा फैलाव वेगाने होत आहे. सत्तरी तालुक्यात भटक्या गोवंशामध्ये अशी लक्षणे त्वचेवर पडलेल्या डागांवरून दिसल्याने भीती निर्माण झाली आहे.

पर्ये भागात एका भटक्या बैलावर तशी लक्षणे नागरिकांना आढळून आली आहेत. बुधवारी होंडा येथील पेट्रोल पंपजवळ भटक्या गायींवर लंपी रोग आढळून आलेला आहे.

वाळपई गोशाळेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रघुनाथ धुरी म्हणाले, सत्तरी भागात रस्त्यावरील भटक्या गोवंशावर ही लक्षणे नागरिकांना दिसत आहेत. 1929 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या रोगाचा शोध लागला.

Lumpy Virus
Pilerne Fire: ‘बर्जर’हटाओ; साळपे गाव बचाओ!

औषधोपचार गरजेचा

प्रमुख लक्षणे म्हणजे बाधित जनावरांना सुरवातीस ताप येतो, चारा खाणे, पाणी पिणे बंद करतात. दोन ते तीन दिवसांनंतर बाधित जनावरांत डोके, मान, पोट, पाय तसेच शेपटीखाली त्वचेवर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी आढळून येतात.

आजारावर प्रतिजैविके, ज्वरनाशक, अँटी एलर्जिक व जीवनसत्त्वे या पद्धतीची औषधे वापरली तर आजारी गुरांत फारशी गुंतागुंत न होता बरी होतात, असा निष्कर्ष आहे, असे डॉ. धुरी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com