मडकईकरांनी उपमहापौरांकडे तात्पुरता कारभार द्यावा; नगरसेवक हळर्णकरांची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

कोरोनाची लागण झाल्यामुळे महापौर मडकईकर किमान पुढचे १५ दिवस तरी महापालिकेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेचा कारभार त्यांनी उपमहापौर वसंत आगशीकरांकडे द्यावा, अशी अपेक्षा असल्याचे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी सांगितले.

पणजी- गेल्या २ दिवसांपूर्वी महापौर मडकईकर यांना कोरोनाची लागण झाली. या परिस्थितीत ते आणखीन २० दिवस कार्यालयात येऊ शकणार नसल्याने त्यांनी उपमहापौर वसंत आगशीकरांकडे द्यावा, अशी मागणी नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी केली. 
महापौर मडकईकर यांच्या बंधूंचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ते १२ दिवस अनुपस्थित होते. आताही त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते किमान पुढचे १५ दिवस तरी महापालिकेत येऊ शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेचा कारभार त्यांनी उपमहापौर वसंत आगशीकरांकडे द्यावा अशी अपेक्षा असल्याचे नगरसेवक रूपेश हळर्णकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या