Viral Video : होली स्पिरीट चर्चमधील चोरट्याचा व्हिडीओ व्हायरल

सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरट्याला नक्की पकडू; फातोर्डा पोलिसांना विश्वास
Madgaon Holy spirit Church Theft Video Viral on Social Media
Madgaon Holy spirit Church Theft Video Viral on Social MediaDainik Gomantak

मडगाव : मडगावातील होली स्पिरीट चर्चला लागून असलेल्या पाद्रीच्या कक्षात सकाळी 6 च्या सुमारास जाऊन दीड लाखांच्या राकमेवर डल्ला मारणाऱ्या त्या चोरट्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमावर चांगलाच व्हायरल झालेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीयुक्त कुतूहल निर्माण झाले आहे.

चोरीच्या उद्देशाने आलेला हा इसम पाद्रीच्या कक्षाच्या मागच्या बाजूने आत शिरून परत जाताना दिसत आहे. त्याने तोंडावर मास्क घातल्याचे दिसून येत आहे. त्याच्या हातात एक पिशवी असून या पिशवीत घालून त्याने ते पैसे नेले असावेत असा संशय आहे. आम्ही या चोरट्याला नक्की पकडू असा विश्वास फातोर्डा पोलीस निरीक्षक धिरेंद्र नाईक यांनी व्यक्त केला आहे.

Madgaon Holy spirit Church Theft Video Viral on Social Media
होली स्पिरिट चर्चमध्ये चोरी; दीड लाखांची रोकड लंपास

याप्रकरणी व्हिक्टर मिनेझिस यांनी पोलिसात तक्रार दिली होती. आज गुरुवारी सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान ही चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात चोरटा मागच्या बाजूने पाद्रीच्या कक्षात शिरून त्याने कपाट फोडून आतली रक्कम लंपास केली. चर्चमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर या चोरट्याची छबी कैद झाली असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com