मडगाव: काब द राम किल्ल्याजवळील महापुरुषाचा डोंगर लक्ष वेधतोय

मडगाव: काब द राम किल्ल्याजवळील महापुरुषाचा डोंगर लक्ष वेधतोय
kab de ram.jpg

मडगाव: अनेक आश्चर्यकारक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या काणकोण (Canacona) तालुक्याजवळ असलेल्या काब द राम (Kab the Ram) या किल्ल्याच्या जवळ असलेला महापुरुषाचा डोंगर हे  असेच आणखी एक आश्चर्य असून हा डोंगर पाहिला की कुणीतरी एक माणूस स्वस्थपणे झोपला आहे असे दिसून येते.

या किल्ल्याचा संबंध कदंबकालीन (Kadamba) असून तो पाहण्यासाठी हजारो देश विदेशी पर्यटक येथे भेट देत असतात. त्यावेळी हा महापुरुषाचा डोंगर पाहून ते अचंबीत होत असतात. (Madgaon The mountain of Mahapurusha near Kab Da Ram fort is attracting attention)  

वास्तविक हा डोंगर सलग नाही. ते दोन तीन डोंगर आहेत. पण ते अशा रांगेत उभे आहेत की कुणालाही झोपलेल्या माणसाची आकृती दिसावी. या किल्ल्यात अशी अनेक निसर्ग रचित आश्चर्ये असून या किल्ल्याच्या टोकाला एक मगरीच्या आकाराचे भुशिर आहे. हा भूखंड 90 दशलक्ष वर्षापूर्वी विलग होऊन आला असावा असा निष्कर्ष असून अशाच प्रकारचा दुसरे तुकडे सेशील्यस आणि मादागास्कर बेटावर सापडले आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com