Madgaon : मडगावात सोपो आणि कचरा गोळा करणाऱ्या ठेकेदारास पुन्हा मुदतवाढ

मडगाव पालिकेवर मुदतवाढ देण्याची नामुष्की; निर्णयासाठी उद्या होणार खास बैठक
Madgaon Municipal Council
Madgaon Municipal CouncilDainik Gomantak

मडगाव : सोपो वसुलीसाठी निविदा मागवूनही न मिळालेला प्रतिसाद त्याचप्रमाणे दारोदार कचरा गोळा कामाचा न सुटलेला घोळ यामुळे पूर्वीच्याच ठेकेदारांकडे आणखी तीन महिने हे काम सोपविण्याची पाळी मडगाव पालिकेवर आली आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पालिकेची खास बैठक उद्या शुक्रवार 22 जुलै रोजी सकाळी 12 वाजता बोलावण्यात आली आहे.

या बैठकीत सोनसोडीवरील शेड दुरुस्ती आणि तेथे जाणाऱ्या रस्ता दुरुस्तीसाठी घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने सादर केलेला प्रस्तावही मंजूर केला जाणार आहे. पालिका गॅरेजमधील भंगार अवस्थेतील चार वाहनांबाबत आलेल्या बोलीवर तसेच सुरक्षा एजन्सीकडील करार वाढविण्यावरही या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.

Madgaon Municipal Council
Sonsodo : सोनसोडोवरील कचरा उचलण्यासाठी 10 दिवसांची मुदत

सोपो ठेक्याची मुदत गत मार्च अखेरीस संपल्यावर त्याला मुदतवाढ देऊन त्या हक्कासाठी नव्याने बोली मागवली होती. पण त्यातील काही अटी जाचक असल्याने एकच बोली आली ती पालिका प्रशासनाकडे पाठवली होती पण त्यांनी निर्णय पालिकेकडे सोपवला आणि त्यामुळे पूर्वीच्या ठेकेदाराला तीन महिने मुदतवाढ देऊन मधल्या काळात पुन्हा बोली मागविल्या जातील.

कचरा गोळा करण्याच्या कामाचे असेच चित्र आहे. त्याची दोन महिने मुदतवाढ या महिना अखेरीस संपते त्यालाही तीन महिने मुदतवाढ देऊन पुन्हा निविदा मागविल्या जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com