मडगाव: अर्ज मागे घेतलेल्या 11 उमेदवारांचा मडगाव नागरी युतीच्या पॅनलला पाठिंबा
Madgaon Support of 11 candidates who withdrew their applications to the panel of Madgaon Civil Alliance

मडगाव: अर्ज मागे घेतलेल्या 11 उमेदवारांचा मडगाव नागरी युतीच्या पॅनलला पाठिंबा

मडगाव  : फातोर्डातून 10 तर मडगावातून 1 अशा 11 उमेदवारांनी शनिवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसच्या मडगाव नागरी युतीला आपला पाठिंबा जाहीर केला. गोवा फाॅरवर्डचे फातोर्डा फाॅरवर्ड व काॅंग्रेसच्या माॅडल मडगाव पॅनलने एकत्र येऊन मडगाव नागरी युती पॅनल स्थापन केला आहे. काँग्रेसचे नेते व  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई व काँग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी एकत्र येऊन मडगाव पालिका निवडणुकीसाठी ही युती केली आहे.

प्रभाग 1 मधून सुकुर फेर्नांडिस व सय्यद जहुर, प्रभाग 3 मधून मोहिद्दीनसाब उंटावाले, प्रभाग 5 मधून जनुआरिया फुर्तादो, प्रभाग 6 मधून रामचंद्र रेडकर, प्रभाग 7 मधून रुझारियो मदेरा , प्रभाग 9 मधून साईनाथ कुट्टीकर , प्रभाग 10 मधून साईप्रसाद नाईक तर प्रभाग 11 मधून शेख आबेदीन यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन फातोर्डा फॉरवर्डच्या  तर प्रभाग 15 मधून सिल्व्हेस्टर कुतिन्हो यांनी अर्ज मागे घेऊन मॉडेल मडगावच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला. (Madgaon Support of 11 candidates who withdrew their applications to the panel of Madgaon Civil Alliance)

गोवा फॉरवर्डचे फातोर्डा गटाध्यक्ष पीटर फेर्नांडिस यांनी या उमेदवारांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.  यावेळी गोवा फॉरवर्डच्या युवा आघाडीचे अध्यक्ष समीर शेख,  माजी  फातोर्डा गटाध्यक्ष सुजय लोटलीक, माजी नगरसेवक ग्लेन आंद्राद व जुझे फर्नांडिस  उपस्थित होते. विजय सरदेसाई आणि मागच्या पालिका मंडळाने फातोर्डात केलेल्या विकासकामाने  प्रभावित होऊन या उमेदवारांनी रिंगणातून माघार घेत आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला, असे फर्ऩांडिस यांनी सांगितले.  भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ नये म्हणून उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी काँग्रेस समितीचे सदस्य सिद्धनाथ बुयाव यांनी विशेष प्रयत्न केले असे फर्ऩांडिस यांनी सांगितले.

शुक्रवारी काॅंग्रेसमधून काही कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला असा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे समीर शेख यांनी सांगितले. भाजपात प्रवेश केलेले कार्यकर्ते हे भाजपचेच असून त्यांनी प्रत्येक निवडणूकीत भाजपसाठीच काम केले आहे. केवळ मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला मिळावा यासाठीच ते रिंगणात उभे असल्याचा आरोप शेख यांनी केला.
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com