मडगाव: घाऊक मासळी मार्केटमधील व्यवहार सुरळीत

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

घाऊक मासळी मार्केटात आजपासून इतर राज्यांतून मासळीची आवक सुरळीतपणे सुरु झाली.

मडगाव: सोपो कंत्राटदार व मासळी विक्रेता संघटनेमधील वाद मिटल्यानंतर येथील घाऊक मासळी मार्केटात आजपासून इतर राज्यांतून मासळीची आवक सुरळीतपणे सुरु झाली. घाऊक मासळी विक्रेता संघटनेच्या सदस्यांची आज 40 वाहने मार्केटात दाखल झाली.

सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस व मासळी विक्रेत्यांमधील वादामुळे गेले आठ दिवस इतर राज्यांतून होणारी मासळीची आवक बंद झाली होती. त्यामुळे राज्यात मासळीची टंचाई झाल्याने दरात वाढ झाली होती. आज मार्केटमधील व्यवहार सुरळीत होते, असे मिलाग्रीस फर्नांडिस व घाऊक मासळी मार्केट विक्रेता संघटनेचे अध्यक्ष इब्राहीम मुसा यांनी सांगितले. (Madgaon Trading in wholesale fish market is smooth)

गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा गटाध्यक्षपदी पीटर फर्नांडिस

इतर राज्यांतून मासळीची आवक झाली तरी बांगडे वगळता इतर मासळीचे दर चढेच होते. बांगडे 200 रुपये किलो, इसवण 550 ते 600 रुपये किलो, तर लेपो 400 रुपये किलो असा दर होता, असे येथील हाॅटेल व्यावसायिक यशवंत परब यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या