मडगाव: शेडो कौन्सिलसह दोन संघटना सिटीझन चाॅईस पॅनलच्या छत्राखाली

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

शेडो कौन्सिलसह सिटीझन्स फाॅर सोनसोडो व गोवा विथ लव्ह या संघटना सिटीझन चाॅईल पॅनलच्या छत्राखाली एकत्र.

मडगाव : शेडो कौन्सिलसह दोन संघटना सिटीझन चाॅईस पॅनल छत्राखाली एकत्र आले असून मडगाव पालिका निवडणुकीसाठी या पॅनलने 10 प्रभागांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत, तर प्रभाग 13 मध्ये एका उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. शेडो कौन्सिलसह सिटीझन्स फाॅर सोनसोडो व गोवा विथ लव्ह या संघटना सिटीझन चाॅईल पॅनलच्या छत्राखाली एकत्र आल्याचे शेडो कौन्सिलचे निमंत्रक व माजी नगराध्यक्ष सावियो कुतिन्हो यांनी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी सिटीझन्स फाॅर सोनसोडोचे सचिव राॅक मास्कारेन्हस, गोवा विथ लव्हचे संस्थापक आॅर्लांद पाशेको व पॅनलेचे उमेदवार उपस्थित होते. 

मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या पॅनलचा पराभव करा असे आवाहन कुतिन्हो यांनी केले. दुप्पट किमतीचा बायोमिथेशन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या नेत्यांना मडगाव पालिकेवर कोण्यात्याही पद्धतीने पन्हा कब्जा करायचा आहे,असा आरोप कुतिन्हो यांनी केला. (Madgaon Two organizations including Shadow Council under the umbrella of Citizen Choice Panel)

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न

 पॅनलने जाहीर केलेले उमेदवार

प्रभाग 1 मॅकेन्झी डिकाॅस्ता, प्रभाग 3 अॅड. सेऊला वाझ, प्रभाग 7 राॅयस्टन गोम्स, प्रभाग 9  मानुएल ओलिवेरा, प्रभाग 12 व्लेम फर्नांडिस, प्रभाग १5 फेबियान कुतिन्हो, प्रभाग 20 पोमा केरकर, प्रभाग 23 नादिया वाझ, प्रभाग 24 प्रितम मोराटगीकर, प्रभाग 25 कुलसूम शेख

संबंधित बातम्या