मडगाव: विठ्ठलदास पै काकोडे यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

त्यांचा जन्म कुंकळ्ळी येथे झाला. सन १९६८ मध्ये ते मडगावात स्थायिक झाले.

मडगाव  : मडगावचे नागरीक विठ्ठलदास यशवंत पै काकोडे यांचे आज अल्प आजाराने दु:खद निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. दुपारी त्यांच्यावर मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांचा जन्म कुंकळ्ळी येथे झाला. सन १९६८ मध्ये ते मडगावात स्थायिक झाले. मेसर्स केशव शेणवी कुंदे अँड कंपनीचे ते भागधारक होते. म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानचे ते माजी अध्यक्ष होते. मडगावच्या रोटरी क्लबचे सदस्य तसेच मडगाव क्रिकेट क्लबचे ते संस्थापक सदस्य होते. (Madgaon Vitthaldas Pai Kakode passed away)

गोवाः चंद्रकांत कवळेकरांकडून उमेदवारांना भूखंडांची ‘ऑफर’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, मठग्रामस्थ हिंदू सभेचे अध्यक्ष पांडुरंग (भाई ) नायक तसेच इतरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. 
 

संबंधित बातम्या