मधुकर मोर्डेकर कुटुंबियांतर्फे केळेकर ज्ञानमंदिराला निधी

प्रतिनिधी
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

 ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक आणि योगगुरू स्वर्गीय मधुकर मोर्डेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कुटुंबियातर्फे विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि शिष्यवृत्ती भेटविण्यासाठी कोकणी भाषा मंडळ संचालीत रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिरच्या पदाधिकाऱ्यांकडे ८० हजार रुपयाचा निधी भेटविण्यात आला.

फातोर्डा: ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक आणि योगगुरू स्वर्गीय मधुकर मोर्डेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कुटुंबियातर्फे विद्यार्थ्यांना बक्षिसे आणि शिष्यवृत्ती भेटविण्यासाठी कोकणी भाषा मंडळ संचालीत रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिरच्या पदाधिकाऱ्यांकडे ८० हजार रुपयाचा निधी भेटविण्यात आला. ह्या निधीतून मिळणाऱ्या व्याजातून विद्यालयात सामाजिक जबाबदारी जोपसणाऱ्या तसेच योगा या विषयात खास अभिरुची दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येतील असे मंडळाच्या अध्यक्षा आणि विद्यालयाची व्यवस्थापिका अन्वेषा सिंगबाळ यानी सांगितले.

मधूबाब हे एक प्रामाणिक आणि तळमळीचे समाजसेवक होते. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यानी समाजाची तन-मन-धन सेवा केली. 

त्यांच्या या कार्यातुन प्रेरणा घेउन नव्या पिढीने समाजिक जबाबदारीची वृत्ती जोपासावी असे कुटुंबियांना वाटते आणि त्यामुळेच ज्या विद्यालयात त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात त्या रविन्द्र केळेकर ज्ञानमंदिरात आम्ही हे बक्षीस आणि शिष्यवृत्ती भेटविण्याचा निर्णय घेतला असे विनायक आणि
विवेक मोर्डेकर ह्यानी सांगितले. मोर्डेकर परिवाराने विद्यालयाला दिलेल्या योगदानाबद्दल विद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य चेतन आचार्य आणि मुख्याध्यापक अनंत अग्नी ह्यानी त्यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या