मधुसुदन देसाई यांचे निधन

dainik Gomantak
गुरुवार, 14 मे 2020

मराठी राजभाषा आंदोलनातील अग्रणी तसेच जाज्वल्य मराठीप्रेमी तिस्क - उसगाव येथील पत्रलेखक व समाज कार्यकर्ते मधुसुदन देसाई (वय ५६) यांचे तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्‍याने बुधवारी रात्री दुःखद निधन झाले. फोंडा येथील मुक्तीधामात गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

फोंडा

मराठी राजभाषेसाठी उभारलेल्या लढ्यात प्रत्येकवेळी त्यांचा सहभाग असायचा. मराठी राजभाषेसाठी ते सातत्याने पत्रलेखन करीत होते. फोंडा पत्रकार संघातर्फे त्यांना गेल्या वर्षी एक ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले होते. वृत्तपत्र लेखक महासंघातर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असलेल्या मधुसुदन देसाई यांनी फोंड्यात गेली अनेक वर्षे पोलिस मित्र म्हणून वावरलेल्या राजू अनाथला त्याच्या अंत्यसमयी घरी कर्नाटकात पोचवण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या मधुसुदन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी फोंडा येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, एक मराठीचा खंदा पुरस्कर्ता आणि भाषेसाठी तळमळीने वावरणारा लढवय्या योद्धा हरपल्याची प्रतिक्रिया मराठीप्रेमींनी व्यक्त केली आहे. मराठी राजभाषा समितीचे गो. रा. ढवळीकर, प्रदीप घाडी आमोणकर, मच्छिंद्र च्यारी, ॲड. शिवाजी देसाई, चंद्रकांत होळकर, प्रकाश भगत तसेच इतरांनी यावेळी मराठीचा एक खंदा पुरस्कर्ता आणि लढवय्या योद्धा हरपल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या